रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात बुधवारी (०४ मे) पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेला आयपीएल २०२२चा ४९वा सामना अतिशय रोमांचक राहिला. उभय संघ या हंगामात दुसऱ्यांदा आमने सामने आले होते. मागील सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी बेंगलोर संघ प्रयत्नशील होता. तर चेन्नई संघ पुन्हा एकदा बेंगलोरला पराभूत करण्यासाठी जोर लावताना दिसला. या सामन्यादरम्यान चेन्नई संघासाठी डोकेदुखी वाढवणारी एक घटना घडली.
चेन्नईचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सामन्यादरम्यान एक झेल पकडण्याच्या नादात दुखापतग्रस्त (Ravindra Jadeja Injury)झाला. चेन्नई संघासाठी हा मोठा धक्का असू शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने या सामन्यात ८ विकेट्सच्या नुकसानावर १७३ धावा केल्या. बेंगलोरकडून महिपाल लोमरोरने सर्वाधिक ४२ धावा फटकावल्या. याच लोमरोरचा झेल पकडण्याच्या नादात जडेजाला दुखापत झाली. ही घटना डावातील अठराव्या षटकादरम्यान घडली.
चेन्नईकडून ड्वेन प्रिटोरियस हे षटक टाकत होता. त्याच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लोमरोरने डिप कव्हरला फटका मारला. तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या जडेजाने धावत जात लोमरोरचा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. पण झेल पकडण्याच्या नादात जडेजाचा पाय मैदानावरील गवतामध्ये अडकला आणि त्याच्या हातून झेल सुटला. तसेच पाय अडकल्यामुळे तो खाली कोसळला आणि त्याच्या शरीराचा संपूर्ण भार त्याच्या हातावर (Ravindra Jadeja Injured Himself) पडला. त्यानंतर तो मैदानावरच वेदनेने कळवळू लागला.
https://twitter.com/Cricupdates2022/status/1521874924906086402?s=20&t=UqMocdRbF2HD2F5mkusN2g
त्यानंतर त्वरित चेन्नई संघाचे फिजिओ मैदानावर आले. त्यांनी जडेजाचा हात तपासला. कर्णधार एमएस धोनी आणि इतर खेळाडूंनीही जडेजाजवळ जाऊन त्याची चौकशी केली. यादरम्यान काही मिनिटांसाठी खेळ थांबवावा लागला. पुढे जडेजाने हिंमत दाखवत खेळ सुरू ठेवला.
https://twitter.com/MTvalluvan/status/1521872687160733697?s=20&t=xWFb3FD1HU-tsTX1KrEbZg
जडेजाने लोमरोरचा झेल सोडल्यानंतर बेंगलोरचा फलंदाज या जीवनदानाचा फायदा घेऊ शकला नाही. तो पुढील एकोणिसाव्या षटकतील पहिल्या चेंडूवर आपली विकेट गमावून बसला. महिश तिक्षिणाने ऋतुराज गायकवाडच्या हातून लोमरोरला झेलबाद केले. तो २७ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ४२ धावा करून बाद झाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाईट झालं! विराटला नाही आवरला धाव चोरण्याचा मोह अन् धोनीने बुलेटच्या वेगाने मॅक्सवेलला केले रनआऊट
पहिल्याच षटकात घडला ड्रामा, चौधरीने विराटला फेकून मारला चेंडू; मग काय झालं पाहाच
तिलक वर्माने सांगितले त्याच्या यशामागचे रहस्य, कर्णधार रोहितच्या ‘या’ सल्ल्यामुळे मिळाली मदत