---Advertisement---

वनडे क्रिकेट वाचवण्यासाठी सेहवागची मोठी मागणी, अहमदाबादमधील स्टेडियम मोकळं पाहून म्हणाला…

Virender Sehwag
---Advertisement---

गुरुवारी (5 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 सुरू झाला. विश्वचषकातील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. भारतात क्रिकेटसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. पण विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत पहिल्या वनडेत चाहत्यांचा उत्साह कमी दिसला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चाहत्यांची संख्या कमी पाहून भारताचा माजी दिग्गज विरेंद्र सेहवाग याने खास मागणीच केली.

विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज राहिला आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेतील संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. अशात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतही सेहवाग लक्ष देऊन आहे. इंग्लंड आणि न्यूझींलड यांच्यातील पहिल्या विश्वचषक सामन्यादरम्यान स्टेडियम बऱ्यापैकी मोकळे दिसले. भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी एवढी कमी गर्दी पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. अशात शेहवागने शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विश्वचषक सामन्यांमध्ये मोफत प्रवेश मिळावा, अशी मागणी केली. सेहवागने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केल्याप्रमाणे भारताचा सामना नसेल, तर इतर शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश दिला पाहिजे.

गुरुवारी (5 ऑक्टोबर) नेरंद्र मोदी स्टेडियममधील चाहत्यांची कमी संख्या पाहून सेहवागने लिहिले की, “ऑफिसची वेळ झाल्यानंतर चाहते स्टेडियममध्ये येतील, अशी आशा आहे. पण ज्या सामन्यात भारत खेळत नाहीये, त्या सामन्यांची तिकिटे शाहा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोफत दिली गेली पाहिजेत. 50 षटकांच्या सामन्यातील रुटी कमी होताना दिसत आहे. अशात या निर्णयामुळे युवकांना विश्वचषक सामना अनुभवता येईल आणि खेळाडूंनाही संपूर्ण भरलेल्या स्टेडियममध्ये खेळता येईल.”

दरम्यान, सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये वर्तवलेल्या अपेक्षेप्रमाणे सामना अर्ध्यात आल्यानंतर मैदानात चाहत्यांची संख्या वाढताना दिसली. उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. निर्धारीत 50 षटकांमध्ये इंग्लंडने 9 विकेट्सच्या नुकसानावर 282 धावा केल्या. (Give free tickets to school and college students in World Cup said Virender Sehwag)

महत्वाच्या बातम्या – 
एकच मारला, पण जबरदस्त मारला! अनुभवी बोल्टच्या चेंडूवर रुटचा नेत्रदीपक रिव्हर्स स्वीप षटकार
CWC23: सॅंटनर-हेन्रीने इंग्लंडला रोखलं! विजय प्रारंभासाठी न्यूझीलंडसमोर 283 धावांचे आव्हान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---