दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज व माजी कर्णधार एबी डिविलियर्स आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर पुन्हा आपल्या मायदेशी म्हणजे दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. हा फावला वेळ तो आपल्या कुटुंबियांसोबत घालवताना दिसतोय. नुकताच त्याने आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसात त्याने एक गाणे गायले. मात्र, त्यानंतर आयपीएलमध्ये त्याचा संघ सहकारी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल याने त्याच्या पोस्टवर कमेंट करत टांग खेचली.
एबीने गायले वडिलांसाठी गाणे
एबीच्या वडिलांनी नुकतीच आपल्या वयाची सत्तरी पूर्ण केली. त्यांचा हा वाढदिवस कौटुंबिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या वाढदिवसामध्ये एबीने आपल्या पत्नीसोबत प्रसिद्ध गायक जेसन मेराज याचे प्रसिद्ध गीत ‘आय वॉन्ट गिव्ह अप’ गायले. या गाण्याचा व्हिडीओ त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांशी शेअर केला. चाहत्यांकडून या गाण्याला चांगली पसंती मिळाली.
https://www.instagram.com/p/CPlxVvkA0o5/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
मॅक्सवेलची मजेदार कमेंट
एबीच्या या गाण्याला चाहते पसंत करत असतानाच, आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी (आरसीबी) एकत्र खेळणारा त्याचा संघ सहकारी व ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने त्याची मजा घेतली. एबीच्या गाण्याच्या व्हिडिओला कमेंट करताना त्याने लिहिले, ‘तुझ्या कामगिरीत पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा दिसत आहे.’
मॅक्सवेल हा प्रथमच आयपीएलमध्ये पहिल्यांदाच आरसीबीचा भाग आहे. तर, एबी २०११ पासून संघाचा प्रमुख खेळाडू असून, त्यांनी काही वेळा संघाचे नेतृत्व देखील केले होते.
आयपीएल झाली स्थगित
भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मे महिन्याच्या सुरुवातीला अचानक वाढ झाली. आयपीएलसाठी तयार केलेल्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने काही खेळाडू व कर्मचारी कोरोनाबाधित झाले. त्यामुळे, आयोजकांनी ४ मे रोजी २९ सामन्यांनंतर स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, २९ मे रोजी झालेल्या बैठकीत उर्वरित आयपीएलचे ३१ सामने युएई येथे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळण्याचे निश्चित करण्यात आले. सध्या दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे.
महत्वाच्या बातम्या:
मला बोर्डाचे चेअरमनपद दिले तर मी वेगवान गोलंदाजांची कमतरता जाणवू देणार नाही
टेस्ट कॅप नं. २८१! ऐतिहासिक लॉर्डसवर न्यूझीलंडसाठी या आफ्रिकन फलंदाजाने केले पदार्पण
लॉर्डस कसोटीत उतरताच जेम्स अँडरसनच्या नावे झाला हा खास विक्रम