नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत या कसोटी मालिकेच्या शेवटच्या सामन्यात अँडरसनने क्रिकेट इतिहासातील अनोखा विक्रम आपल्या नावे केला.
५६४ बळी घेत तो वेगवान गोलंदाजांच्या यादीत सर्वधिक बळी घेण्यामध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या (५६३ बळी) नावे असलेला विक्रम मोडत त्याने या पराक्रम केला.
आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने इंग्लडच्या वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला ६०० विकेट घेण्याचे आव्हान केले आहे.
त्याची ५६४ वी विकेट भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी ठरला. त्याच्या पुढे आता फक्त भारताचा अनिल कुंबळे (६१९), आँस्ट्रेलियाचा शेन वाँर्न (७०८) आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन(८००) आहेत.
जर त्याने ६०० पर्यंत विकेटची संख्या नेली तर ते अतुल्य योगदान असेल असे मॅकग्राने बीबीसी रेडिओ ५ शी बोलताना सांगितले. हा विक्रम माझ्या नावावर होता याचा मला अभिमान असून अँडरसनकडून हा विक्रम मोडल्याचा आपल्याला आनंद झाल्याचे तो म्हणाला.
मला जिमीचा अभिमान असून तो बऱ्याच काळापासून उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. १४० सामन्यानंतर देखील तो दर्जेदार गोलंदाजी करत आहे. हा विक्रम मोडण्याची अपेक्षा जिमी आणि दक्षिण अफ्रिकेचा डेल स्टेन या दोघांकडून मला होती.
एक वेगवान गोलंदाज म्हणून खेळताना दुखापतींकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. त्याचा विचार करता जिमी खूप काळापासून उच्च दर्जाचे शारिरीक आणि मानसिक संतूलन ठेऊन आहे.
स्विंग करण्याच्या कलेत त्याच्यापेक्षा सरस सध्या तरी दुसरा गोलंदाज नाही. जेव्हा मी वसिम अक्रमचा विचार करतो तो एक सार्वकालिन महान गोलंदाज असून तो चेंडू कशाही प्रकारे स्विंग करु शकत होता. योग्य टप्प्यावर बॉल टाकून स्विंग करण्याची कला जिमीला देखील चांगली अवगत आहे.
पुढील श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत त्याला आणि त्याचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉडला विश्रांती मिळण्याची शक्यता मॅकग्राने वर्तवली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–पाचवी कसोटी: इंग्लंडने दिला अॅलिस्टर कूकला विजयी निरोप
–जेम्स अँडरसन बनला कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज