---Advertisement---

ग्लेन मॅक्सवेलची अर्धशतकी खेळीबरोबरच ‘मोठ्या’ विक्रमाला गवसणी, ठरला ५ वाच ऑसी क्रिकेटर

On: गुरूवार, सप्टेंबर 30, 2021 12:58 AM
---Advertisement---

दुबई। राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात बुधवारी (२९ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४३ वा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ७ विकेट्सने विजय मिळवला. बेंगलोरच्या या विजयात ग्लेन मॅक्सवेलने मोलाचा वाटा उचलला. त्याने नाबाद अर्धशतकी खेळी केली. यासह त्याने एक खास विक्रम केला आहे.

या सामन्यात राजस्थानने बेंगलोरला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेलने ३० चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि १ षटकार मारला. या खेळीदरम्यान त्याने ७००० टी२० धावा पूर्ण केल्या.

त्यामुळे तो टी२० क्रिकेट प्रकारात ७००० धावा पूर्ण करणारा जगातील २९ वा खेळाडू ठरला. तर ऑस्ट्रेलियाचा ५ वा खेळाडू ठरला. मॅक्सवेलच्या आता ३१७ टी२० सामन्यांत २९६ डावात फलंदाजी करताना ७०२४ धावा झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३ शतकांचा आणि ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याने तिन्ही शतकं आंतरराष्ट्रीय स्तरावर टी२० क्रिकेट खेळताना केली आहेत.

मॅक्सवेलपूर्वी डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच, शेन वॉटसन आणि ब्रॅड हॉग यांनी टी२० क्रिकेट प्रकारात ७००० धावांचा टप्पा पार केला आहे.

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू
१००१९ – डेव्हिड वॉर्नर (३०६ सामने)
९८४५ – ऍरॉन फिंच (३२४ सामने)
८८२१ – शेन वॉटसन (३४३ सामने)
७४०६ – ब्रॅड हॉग (२७७ सामने)
७०२४ – ग्लेन मॅक्सवेल (३१७ सामने)

बेंगलोरचा विजय 
बुधवारी झालेल्या सामन्यात बेेंगलोरकडून १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मॅक्सवेलने श्रीकर भारतबरोबर तिसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली होती. श्रीकर भारतने ४४ धावा केल्या. तसेच विराट कोहलीने २५ आणि देवदत्त पडीक्कलने २२ धावांची खेळी केली. त्यामुळे बेंगलोरने १७.१ षटकात ३ विकेट्स गमावत १५० धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग केला. राजस्थानकडून केवळ मुस्तफिजूरला विकेट्स घेता आल्या. त्याने २ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, राजस्थानने सुरुवात चांगली केली होती. त्यांच्याकडून एविन लुईस आणि यशस्वी जयस्वालने ७७ धावांची सलामी दिली होती. लुईसने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. तर जयस्वालने ३१ धावा केल्या. पण हे दोघे बाद झाल्यानंतर राजस्थानने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. त्यामुळे २० षटकांत त्यांना ९ बाद १४९ धावाच करता आल्या. बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर, शहाबाज अहमद आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच डॅनिएल क्रिश्चियन आणि जॉर्ज गार्टनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

चपळतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा परागच्या डायरेक्ट थ्रोने केला घात, पाहा व्हिडिओ

कोण आहे ‘हा’ इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू? ज्याने आरसीबीसाठी केले आयपीएल पदार्पण

‘सुपर फ्लॉप’ रियान पराग आला नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, होतोय जबरदस्त ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---