सोमवारी (16 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक 2023 मध्ये आपला पहिला विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत श्रीलंकेला फार मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. त्यानंतर सुरुवातीच्या धक्क्यांनंतरही सामना जिंकण्यात त्यांनी यश मिळवले. त्यांच्या विजयात अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्याने आपल्या छोटेखानी खेळी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या विजयात हातभार लावताना एक विक्रम देखील केला.
या विश्वचषकात मॅक्सवेल आतापर्यंत केवळ चेंडूनेच प्रभाव पाडत होता. मात्र, या सामन्यात त्याने सहाव्या क्रमांकावर येऊन 21 चेंडूत 31 धावांची नाबाद खेळी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. या खेळीत त्याने चार चौकार आणि दोन षटकारही मारले. मॅक्सवेलने पहिला षटकार मारताच त्याच्या नावावर एक विशेष कामगिरी जमा झाली.
ग्लेन मॅक्सवेल आता भारतात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारणारा विदेशी फलंदाज बनला आहे. या सामन्यापूर्वी त्याच्या आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज कायरन पोलार्डच्या नावावर प्रत्येकी 49 षटकार होते. परंतु आता ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूच्या नावावर 51 षटकार आहेत. मॅक्सवेलने भारतातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून 38 डाव खेळले आहेत, तर पोलार्डने केवळ 28 डाव खेळले आहेत.
या बाबतीत अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाण आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांच्या नावावर भारतात प्रत्येकी 48 आंतरराष्ट्रीय षटकार आहेत. भारतात अफगाणने 38 तर डिव्हिलियर्सने 41 डाव खेळले. पाकिस्तानचा दिग्गज शाहिद आफ्रिदीचे नाव या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. आफ्रिदीने भारतात खेळलेल्या 40 डावांमध्ये 45 षटकार खेचले होते.
(Glenn Maxwell Break Kieron Pollard Record Now He Hits Most Sixes In India As Foreigner)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपमध्ये जायंट किलर ठरतोय मदुशंका! आजवर बाद केलेल्या फलंदाजांची यादी पाहाच
विश्वचषकात पुन्हा होणार उलटफेर? नेदरलँड्स देणार का दक्षिण आफ्रिकेला धक्का?