---Advertisement---

पुन्हा आलं ग्लेन मॅक्सवेल नावाचं तुफान, जबरदस्त स्ट्राईक रेटसह ठोकलं शतक, रोहितच्या विक्रमाची बरोबरी*

On: रविवार, फेब्रुवारी 11, 2024 4:12 PM
Glenn Maxwell
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रविवारी (11 फेब्रुवारी) ग्लेन मॅक्सवेल याने धावांचा पाऊस पाडला. अवघ्या 55 चेंडूत मध्यक्रमातील फलंदाजाने 120* धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 241 धावा केल्या असून वेस्ट इंडीजला विजयासाठी 242 धावांचे लक्ष्य मिळाले आहेत. मॅक्सवेलने खास यादीत भारतीय दिग्गज रोहित शर्मा याची बरोबरी देखील रविवारी केली.

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने 200च्या स्ट्राईक रेटने धावा करत शतक पूर्ण केले. अवघ्या 50 चेंडूत रविवारी त्याने कारकिर्दीत पाचव्यांना टी-20 आंतरराष्ट्रीय शतक साकारले. या शतकासोबतच त्याने रोहित शर्मा याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरी केली. आता दोघांच्या नावावर प्रत्येकी 5-5 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. (Glenn Maxwell equals Rohit Sharma’s record for the most centuries in men’s T20Is.)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-20 शतके करणारे खेळाडू
5 – रोहित शर्मा (143 डाव)
5 – ग्लेन मॅक्सवेल (94)
4 – सूर्यकुमार यादव (57)
3 – बाबर आजम (103)
3 – कॉलिन मुनरो (62)
3 – सबवुन दाविळी (31)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, जोश इंग्लिस, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन, जेसन बेहरनडॉर्फ, जोश हेझलवूड.

वेस्ट इंडिज – ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शाई होप, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ

महत्वाच्या बातम्या – 
U19 IND vs AUS Final : अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये महाराष्ट्रातील खेडचा अंपायर, कोण आहे तो? वाचा सविस्तर
IND vs ENG । दुखापत की खराब फॉर्म? जाणून घ्या श्रेयस अय्यर संघातून बाहेर पडण्याचे खरे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---