ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका आनंदाच्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. तो भारतीय वंशाच्या मुलीबरोबर लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नासोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मॅक्सवेलच्या पत्नीचे नाव विनी रमण असून तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या एका फोटोला तिने ‘मिस्टर अँड मिसेस मॅक्सवेल. १८.०३.२२’ असे कॅप्शनही दिले आहे. तसेच तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यात दोघांच्या हाताच्या बोटांमध्ये अंगठी घातलेली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंवरून आणि त्या फोटोंना दिलेल्या कॅप्शनवरून समजते की, ग्लेम मॅक्सवेल आणि विनी रमण यांचे १८ मार्च रोजी ख्रिस्ती पद्धतीने लग्न झाले आहे.
https://www.instagram.com/p/CbRZdServhU/
मॅक्सवेलने २०२० मध्ये केलेला साखरपूडा
मॅक्सवेलने २०२० साली विनी रमण (Vini Raman) या भारतीय वंशाच्या मुलीबरोबर साखरपुडा केला होता. विशेष म्हणजे त्याने भारतीय पद्धतीने साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता साखरपुड्याच्या २ वर्षांनंतर दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत.
विनी आणि ग्लेन मॅक्सवेल हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. विनी हिने मेडिकल सायन्सची पदवी घेतली आहे. तसेच मेलबर्नमध्येच फार्मासिस्ट म्हणून काम करत आहे. विनी भारतीय वंशाची असली, तरी ती ऑस्ट्रेलियामध्ये कुटुंबासह स्थायिक झालेली आहे. पण असे असले तरी अनेकदा ती भारतात येत असते.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडूनही मॅक्सवेलला शुभेच्छा
आयपीएलमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने गेल्यावर्षी मॅक्सवेलला आपल्या संघात सामील केले होते. त्यानतंर त्यांनी आयपीएल २०२२ साठी देखील त्याला संघात कायम केले. त्यामुळे आता मॅक्सवेल आयपीएल २०२२ मध्ये बेंगलोरकडून खेळताना दिसणार आहे. दरम्यान, बेंगलोर संघानेही मॅक्सवेलला त्याच्या लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
The RCB family is incredibly happy for @vini_raman and @Gmaxi_32 on the beginning of this new chapter in their lives. 🥳🤩
Wishing you both all the happiness and peace, Maxi! ❤️🙌🏻 pic.twitter.com/RxUimi3MeX
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 19, 2022
बेंगलोरला आयपीएल २०२२ हंगामातील पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध २७ मार्च रोजी खेळायचा आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एमएस धोनीच्या ७ वर्षीय लेकीचे गंगा स्नान, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
धोनीबद्दल काय आहेत भावना? गंभीर म्हणतोय, ‘१३८ कोटी लोकांसमोर सांगू शकतो की…’
बांगलादेशने रचला इतिहास, दक्षिण आफ्रिकेत जिंकली पहिली वनडे; मालिकेतही घेतली आघाडी