---Advertisement---

दुर्दैवच, दुसर काय? चार महिन्यांनी‌ मैदानावर उतरलेल्या मॅक्सवेलला पुन्हा दुखापत! ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ

On: मंगळवार, फेब्रुवारी 21, 2023 4:42 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल यांनी नुकतेच पुनरागमन केले होते. टी20 विश्वचषकानंतर पायाच्या दुखापतीमुळे तो संघाच्या बाहेर होता. या दुखापतीतून सावरल्यानंतर जवळपास चार महिन्यांनी त्याने ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत स्पर्धा असलेल्या स्पर्धेतून पुनरागमन केलेले. मात्र, या पुनरागमनच्या सामन्यातच त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. त्याची दुखापत थोडी गंभीर असल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे त्याची भारत दौऱ्यासाठीच्या वनडे संघात निवड होणार का याविषयी देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेय.

टी20 विश्वचषानंतर तो पायाच्या दुखापतीमुळे कोणत्याही सामन्यात सहभागी झाला नव्हता. त्यानंतर आता त्याने ऑस्ट्रेलियातील सर्वात मानाची प्रथमश्रेणी स्पर्धा असलेल्या शेफिल्ड शिल्ड या स्पर्धेतून पुनरागमन केलेले. विक्टोरिया संघाकडून खेळताना तो दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सहभागी झाला.‌ मात्र, स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करताना त्याच्या मनगटाला दुखापत झाली.‌

 

मॅक्सवेल स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू काहीसा पुढे पडला. टप्पा पडलेला हा चेंडू येऊन थेट त्याच्या मनगटावर लागला. यानंतर मॅक्सवेल मैदानावर वेदनेत असलेला दिसला. त्याने‌‌तात्काळ मैदान सोडत उपचार घेतले. त्याच्या दुखापतीबाबत संघाकडून अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसली तरी, सूत्रांच्या माहितीनुसार चेंडू जोरदारपणे त्याच्या मनगटावर लागला आहे.

मॅक्सवेल हा तब्बल चार वर्षानंतर शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत सहभागी झाला होता. 2019 मध्ये त्याने आपला अखेरचा शेफिल्ड शिल्ड सामना खेळलेला. त्याचे हे पुनरागमन फारसे यशस्वी ठरले नव्हते. कारण, तो केवळ पाच धावा काढून पायचित झालेला. तो या दुखापतीतून न सावरल्यास भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेला त्याला मुकावे लागेल. ऑस्ट्रेलिया संघासाठी हा मोठा धक्का असेल.

(Glenn Maxwell Injured On His Sheffield Shield Comeback Doubtful For India Tour)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत दौरा मध्येच सोडून जाणारा ऑस्ट्रेलियन पठ्ठ्या पहिल्यांदाच बनला ‘बापमाणूस’, बाळाचं नावही केलं जाहीर
भारतीय संघाच्या जर्सीवर झळकणार ‘या’ आघाडीच्या ब्रँडचा लोगो! करार पक्का करण्यासाठी बीसीसीआय सज्ज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---