ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) मेजर लीग क्रिकेट (MLC) च्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. वॉशिंग्टन फ्रीडमकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेलनं 15 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर संघानं एलए नाइट रायडर्सचा 8 गडी राखून पराभव केला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मॅक्सवेलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर त्यानं एका चाहत्याला तो पुरस्कार भेट म्हणून दिला.
वॉशिंग्टन फ्रीडमनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ग्लेन मॅक्सवेल आपला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार एका चाहत्याला देताना दिसत आहे. तेथे उपस्थित असलेले चाहते मॅक्सवेलसाठी टाळ्या वाजवताना दिसत आहेत. लोकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या. एका चाहत्याने लिहिले, “तू आरसीबीयन असल्याचा अभिमान आहे.”
एका चाहत्याने लिहिले, “सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू दयाळू आहेत.” आणखी एका चाहत्याने लिहिले, “मला ग्लेन मॅक्सवेलचा चाहता म्हणवून घेण्याचा खूप अभिमान वाटतो.”
View this post on Instagram
चर्च स्ट्रीट पार्क येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडमने एलए नाइट रायडर्स संघाला 18.4 षटकांत 129 धावांत गुंडाळले. मॅक्सवेलशिवाय सौरभ नेत्रावळकरनं वॉशिंग्टन फ्रीडम संघाकडून 4 विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन फ्रीडमनं 16 षटकात 2 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. ट्रॅव्हिस हेड (54) आणि स्टीव्ह स्मिथ (42) यांनी वॉशिंग्टन फ्रीडमला विजय मिळवून दिला. 2024च्या टी20 विश्वचषकात मॅक्सवेलची कामगिरी चांगली नव्हती. सुपर-8 मध्ये भारताकडून पराभूत झाल्यानं ऑस्ट्रेलिया टी20 विश्वचषकातून बाहेर पडला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या माजी क्रिकेटपटूचा गडबड घोटाळा! प्रशिक्षकाच्या मदतीनं केली वयात फसवणूक
पॅरिस ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने भारतामध्ये कुठे आणि कधी पाहायचे? जाणून घ्या एका क्लिकवर
दिल्ली कॅपिटल्सला हवा ‘गौतम गंभीर’, ‘दादा’चा मुख्य प्रशिक्षकपदाचा दावा फेटाळला