---Advertisement---

पॅरिस ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने भारतामध्ये कुठे आणि कधी पाहायचे? जाणून घ्या एका क्लिकवर

On: मंगळवार, जुलै 16, 2024 6:34 PM
Paris Olympic 2024
---Advertisement---

यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) 2024 ला 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या खेळांमध्ये जगातील 10 हजारांहून अधिक खेळाडू पदक जिंकण्यासाठी संघर्ष करणार आहेत. तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, घोडेस्वारी, गोल्फ, हॉकी, शूटिंग, नौकानयन, टेबल टेनिस, टेनिस, कुस्ती, वेल्टलिफ्टिंग, पोहणे, रोव्हिंग, ज्युडो हे 16 खेळ ऑलिम्पिक स्पर्धामध्ये खेळले जाणार आहेत. हे खेळ आपण भारतामध्ये कुठे आणि कधी पाहायचे हे आपण पाहूया.

यावेळी भारतीय पथकात 113 खेळाडूंचा समावेश आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकं जिंकली होती.

मीडिया प्रायवेट लिमिटेड (Viacom18) कडे भारतातील तसेच उपखंडात पॅरिस ऑलिम्पिकचे प्रसारण करण्याचे खास मीडिया अधिकार आहेत. फ्रान्सच्या राजधानीत होणारे उन्हाळी ऑलिम्पिक (स्पोर्ट्स 18) वाहिनीवर पाहता येणार आहेत. तर जिओ सिनेमावर ऑलिम्पिक पूर्णपणे मोफत पाहता येणार आहे. (मे) मध्ये, जिओ सिनेमाने आपल्या ॲपवर ऑलिम्पिक 2024 लाईव्ह स्ट्रीम करण्याची घोषणा केली होती. याशिवाय प्रेक्षक दूरदर्शनच्या स्पोर्ट्स चॅनलवर देखील थेट सामने पाहू शकतात.

पॅरिस भारतीय वेळेपेक्षा 3 तास 30 मिनिटे मागे आहे. ऑलिम्पिक अधिकृतपणे 26 जुलै रोजी सुरू होईल, तर फुटबॉल आणि रग्बी सेव्हन्सचे सामने 24 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

दिल्ली कॅपिटल्सला हवा ‘गौतम गंभीर’, ‘दादा’चा मुख्य प्रशिक्षकपदाचा दावा फेटाळला
मंगोलियाच्या नव्या कोऱ्या जर्सीचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
यष्टीरक्षक रिषभ पंत सीएसकेत घेणार धोनीची जागा? आयपीएल 2025 मध्ये होऊ शकतो मोठा फेरबदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---