---Advertisement---

भारतीय मुलीशी मार्चच्या अखेरीस लग्नगाठ बांधणार मॅक्सवेल! तमिळ भाषेतील लग्नपत्रिका व्हायरल

On: सोमवार, फेब्रुवारी 14, 2022 6:15 PM
Glenn-Maxwell-and-Vini-Raman
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) त्याच्या खेळण्यामुळे नेहमीच चर्चेत असतो, पण सध्या तो मैदानवरील कामगिरीमुळे नाही, तर वैयक्तिक आयुष्यातील एका मोठ्या घटनेमुळे चर्चेल आला आहे. तो लवकरच भारतीय वंशाच्या मुलीबरोबर मार्चच्या अखेरीस लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. त्याच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मॅक्सवेलने 2020 मध्ये केलेला साखरपूडा
मॅक्सवेलने 2020 साली विनी रमण (Vini Raman) या भारतीय वंशाच्या मुलीबरोबर साखरपुडा केला होता. विशेष म्हणजे त्याने भारतीय पद्धतीने साखरपुडा केला होता. त्यानंतर आता तो विनीबरोबर मार्च अखेरीस लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता आहे.

सोशल मीडियवर व्हायरल होत असलेली त्यांच्या लग्नाची पत्रिका तमिळ भाषेत छापलेली दिसत आहे. असे असले तरी त्यांच्या लग्नाची तारिख आणि ठिकाण इंग्लिशमध्ये छापण्यात आले आहे. त्यामुळे या पत्रिकेनुसार मॅक्सवेल 27 मार्च रोजी मेलबर्नमध्ये लग्न करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या लग्नाची ही पत्रिका कस्तुरी शंकर यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

तसेच हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, ‘ग्लेन मॅक्सवेल विनी रमणबरोबर लग्न करत आहे. ते तमिळ मुहुर्तानुसार लग्न करत आहेत. आपण पैज लावू शकतो की, ते तमिळ पद्धतीने लग्न करतील. पण, लग्नान पांढरा गाऊन पण असेल का? ग्लेन मॅक्सवेल आणि विनी तुम्हाला खूप शुभेच्छा.’ (Wedding invitation card in Tamil)

विनी आणि त्याचे लग्न भारतीय पद्धतीनेच होणार असल्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीच विनीने त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करताना सांगितले होते की, तिने ग्लेन मॅक्सवेलला भारतीय पद्धतीचे लग्न काय असते, याचा टीझर दाखवला आहे.

विनी आणि ग्लेन मॅक्सवेल हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. विनी हिने मेडिकल सायन्सची पदवी घेतली आहे. तसेच मेलबर्नमध्येच फार्मासिस्ट म्हणून काम करत आहे.

https://www.instagram.com/p/B9taXQkpEtc/

तसेच जर त्यांचे लग्न मार्चच्या अखेरीस झाले आणि आयपीएल 2022 ला देखील मार्च अखेरीस सुरुवात झाली, तर त्याला आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागू शकते. मॅक्सवेल आयपीएल 2022 साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Valentines Day Special : ५ वर्षे भारताच्या स्टार खेळाडूच्या अफेअरची कुणालाच नव्हती माहिती

अनसोल्ड गेलेल्या अमित मिश्रासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघमालकाची भावूक पोस्ट; लिहीले…

टेनिस क्रिकेटचा ‌‌बादशाह खेळणार केकेआरसाठी; केवळ १० चेंडूत ठोकलेय अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---