ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ मागील अडीच महिन्यांपासून भारतात आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तीन सामने खेळून झाले आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सहा खेळाडूंनी आता माझ्याशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. दौऱ्याच्या सुरुवातीपासून संघात असलेल्या या खेळाडूंना विश्रांतीसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने माघारी बोलावले. यामध्ये अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याचा देखील समावेश असून, मायदेशी जाण्याआधी त्याने एक सोशल मीडिया पोस्ट करत भारताचे आभार मानले.
मॅक्सवेल सप्टेंबर महिन्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषक खेळला. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभूत करत विश्वचषकाला गवसणी घातली. स्वतः मॅक्सवेल याने या विश्वचषकात विश्वचषक इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावले. तसेच, अफगाणिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना नाबाद 200 धावांची ऐतिहासिक खेळी केली.
https://www.instagram.com/p/C0OSdkrJJpa/?igshid=MzRlODBiNWFlZA==
त्यानंतर भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या टी20 मालिकेतील तिसऱ्या व आपल्या या दौऱ्यावरील अखेरच्या सामन्यात देखील त्याने नाबाद शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला 223 धावांचे आव्हान पार करून दिले. मायदेशी रवाना होण्यापूर्वी त्याने एक सोशल मीडिया पोस्ट करत लिहिले,
‘घरी जाण्याची वेळ झाली. थँक्यू इंडिया या अविस्मरणीय दौऱ्यासाठी.’
मॅक्सवेल याच्यासह स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, ऍडम झम्पा, सीन ऍबॉट व जोश इंग्लिस हे देखील मायदेशी जात आहेत. मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळण्यासाठी काही युवा खेळाडू भारतात पोहोचले आहेत.
(Glenn Maxwell Special Post After Departure For Australia After 2 Month Tour)
महत्वाच्या बातम्या –
पुणे जिल्हा हौशी ऍथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदी अभय छाजेड, सचिवपदी राजीव कुलकर्णी, खजिनदारपदी रोहित घाग यांची निवड
IND vs AUS । ज्याच्यामुळे शतक वाया गेले, त्यालाच पाठीशी घातले! पाहा पराभवानंतर ऋतुराज काय म्हणाला





