मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने गुजरात टायटन्सला ८ विकेट्सने पराभूत केले. या दोन्ही संघ वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी (१९ मे) हंगामातील ६७ व्या सामन्यात आमने-सामने आले होते. बेंगलोरच्या या विजयात फलंजादाजांनी महत्त्वाची भूमिका निभावली. पण, या सामन्यात बेंगलोरचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याच्या बाबतीत त्याला फलंदाजीच्या सुरुवातीलाच नशीबाची साथ मिळाली.
बाद होता होता वाचला मॅक्सवेल
गुजरातने बेंगलोरला (Gujarat Titans vs Royal Challengers Bangalor) या सामन्यात १६९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डू प्लेसिसने (Faf du Plessis) शानदार सुरुवात केली. त्यांनी ११५ धावांनी सलामी भागीदारी रचली. पण, त्यांनी जोडी १५ व्या षटकात फाफ डू प्लेसिस ४४ धावा करून बाद झाल्याने तुटली. त्यामुळे विराटला साथ देण्यासाठी ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आला.
मॅक्सवेलने १५ व्या षटकात मैदानात आल्यानंतर लगेचच पहिल्याच चेंडूवर राशिद खानविरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा प्रयत्न चूकला आणि चेंडू लेग स्टंपला घासून मागे चौकारासाठी गेला. चेंडू स्टंपला लागूनही बेल्स पडल्या नाही, त्याचमुळे मॅक्सवेलला जीवदान मिळाले. क्रिकेटमध्ये जोपर्यंत स्टंप्सवरील बेल्स पडत नाहीत, तोपर्यंत फलंजादाला बाद देता येत नाही.
यापूर्वी असेच आयपीएल २०२२ मध्येच डेव्हिड वॉर्नरच्या बाबतीत झाले होते. युजवेंद्र चहलने वॉर्नरला टाकलेला चेंडू स्टंप्सला लागला, पण बेल्स पडल्या नव्हत्या (Bails Refuse to fall).
दरम्यान, मॅक्सवेलने मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर वापर करत आक्रमक फलंदाजी केली. त्याने १८ चेंडूत ४० धावांची नाबाद खेळी केली आणि बेंगलोरला विजय मिळवून दिला. बेंगलोरकडून विराटनेही चांगली फलंदाजी करताना ५४ चेंडूत ७३ धावांची खेळी केली.
https://twitter.com/AkshatOM10/status/1527339173396434950
https://twitter.com/Rahulc7official/status/1527339872960204806
Unlucky Rashid Khan – ball hit the stumps, but bails weren't dislodged. pic.twitter.com/mdCq924LWm
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 19, 2022
गुजरातकडून हार्दिकचे अर्धशतक
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातला २० षटकात ५ बाद १६८ धावा करता आल्या होत्या. गुजरातकडून कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. हार्दिकव्यतिरिक्त डेव्हिड मिलरने ३४ आणि वृद्धिमान साहाने ३१ धावांचे चांगले योगदान दिले. बेंगलोरकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
कोणता असेल तो संघ? गुजरातच्या पराभवाने अन् बंगळुरूच्या विजयाने आयपीएलमध्ये घडणार नवा इतिहास
राहुल द्रविडनी शोधलेला हिरा ‘आयुष बदोनी’ गाजवतोय आयपीएल, वाचा त्याचा रोमांचक प्रवास
बंगळूरूचं भविष्य मुंबईच्या हाती असल्याचं समजताच कर्णधार फाफने रोहितला केली ‘ही’ विनंती