---Advertisement---

फॉर्म गेल्यानंतरही तोच काळ सर्वात आनंदी असल्याचं म्हणतोय विराट, वाचा कारण

On: शुक्रवार, मे 20, 2022 12:38 PM
Virat-Kohli
---Advertisement---

विराट कोहली याने गुरुवारी (१९ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना गुजरात टायटन्स विरुद्ध इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ७३ धावांची शानदार खेळी केली. या खेळीमुळे बेंगलोरला वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात ८ विकेट्सने विजय मिळवण्यात मदत झाली. विराटने या खेळीच्या जोरावर सामनावीर पुरस्कार देखील आपल्या नावावर केला. दरम्यान, विराट गेल्या अनेक महिन्यांपासून फलंदाजी करताना संघर्ष करत असल्याचे दिसले होते. त्यामुळे त्याच्यावर टीकाही बरीच होत होती. पण आता या काळाबद्दल त्यानेच मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 

विराटने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, ‘मी आत्ता अनुभवत आहे की, पूर्वीपेक्षा जास्त मी माझ्या स्वत:ला जास्त महत्त्व देत आहे आणि माझ्या स्वत:ची काळजी घेत आहे. मी खरंतर माझ्या आयुष्यातील आनंदी काळातून जात आहे. मी मैदानावर जे करत आहे, त्याकडे लक्ष देत नाही. मी या काळातून पुढे गेलो असून आता माझ्यासाठी विकासाचा काळ आहे.

याबरोबरच विराट म्हणाला, ‘मला असे म्हणायचे नाही की माझी प्रेरणा पहिल्यासारखी नाही, माझी प्रेरणा कधी संपणार नाही. ज्यादिवशी माझी भूक मिटेल, त्यादिवशी मी हा खेळ खेळणे थांबवेल.’ विराट पुढे असेही म्हणाला की, ‘आपल्याला समजले पाहिले, काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. आपल्या नियंत्रणात त्याच गोष्टी असतात, ज्यावर आपण काम करू शकतो. जे की मैदानावर कठोर परिश्रम करणे आहे आणि आयुष्यातही हाच दृष्टीकोन आहे. मला वाटते की, मी सध्या माझ्या आयुष्यातील सर्वात संतुलित स्थितीत आहे. आणि माझे आयुष्य जसे सुरू आहे, त्यासाठी मी खुश आहे (Virat Kohli says current career phase is his ‘happiest’).

विराटने सांगितले की, आता मैदानावर जे काही होते, त्याने तो निराश किंवा फार उत्साहीत होत नाही. तसेच तो त्याच्या खेळण्याबद्दल म्हणाला, ‘हे केवळ माझ्यासाठी नव्हते. पण हे खरं आहे की मला हवे तसे मी संघासाठी योगदान देऊ शकलो नव्हतो. त्यामुळे मी जास्त निराश होतो, माझ्या वैयक्तिक कामगिरीसाठी नाही. मला माझ्या संघाला खाली आणायचे नव्हते.’

विराटने गुरुवारी जिंकलेला सामनावीर पुरस्कार हा त्याचा आयपीएल २०२० नंतरचा पहिला आयपीएल सामनावीर पुरस्कार आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

नाबाद ४० धावा चोपणारा मॅक्सवेल पहिल्याच चेंडूवर झाला असता बाद, पण नशीबाने ‘अशी’ दिली साथ

कोणता असेल तो संघ? गुजरातच्या पराभवाने अन् बंगळुरूच्या विजयाने आयपीएलमध्ये घडणार नवा इतिहास

राहुल द्रविडनी शोधलेला हिरा ‘आयुष बदोनी’ गाजवतोय आयपीएल, वाचा त्याचा रोमांचक प्रवास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---