---Advertisement---

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, या कारणामुळे ग्लेन मॅक्सवेलने घेतला क्रिकेटमधून ब्रेक

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने(Glenn Maxwell) अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती(Indefinite break) घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे(Mental Health struggles) ही विश्रांती घेतली आहे. याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने(Cricket Australia)माहिती दिली.

त्याने विश्रांती घेतल्याने 1 नोव्हेंबरला श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टी20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात त्याचा बदली खेळाडू म्हणून डॉर्सी शॉर्टची निवड करण्यात आली आहे.

मॅक्सवेलबद्दल ऑस्ट्रेलिया संघाचे मानसशास्त्रज्ञ (psychologist) मायकल लॉइड म्हणाले, ‘ग्लेन मॅक्सवेल सध्या मानसिक त्रासाचा सामना करत आहे. त्यामुळे तो क्रिकेटमधून काही काळासाठी विश्रांती घेत आहे.’

याबरोबरच क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही मॅक्सवेलला विश्रांतीच्या निर्णयासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघांचे व्यवस्थापक बेन ऑलिव्हर म्हणाले, ‘आमच्या खेळाडूंचे आणि कर्मचार्‍यांचे स्वास्थ्य सर्वात महत्त्वाचे आहे. ग्लेनला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.’

‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया क्रिकेट व्हिक्टोरियाच्या सपोर्ट स्टाफच्या सहकार्याने ग्लेनचे आरोग्य सांभाळण्याचा आणि त्याच्या क्रिकेटमधील पूनरागमनासाठी काम करेल.’

त्याचबरोबर ऑलिव्हर म्हणाले, ‘आम्ही सर्वांना विनंती करतो ग्लेन आणि त्याच्या कुटुंबियांना व मित्रांना थोडा वेळ द्या. तो एक खास खेळाडू आहे आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहे. आम्हाला आशा आहे तो पुन्हा संघात येईल.’

मॅक्सवेलला जरी मानसिक त्रास होत असला तरी त्याची क्रिकेटमधील कामगिरी चांगली झाली आहे. त्याने 27 ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात 28 चेंडूत 62 धावांची खेळी केली होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---