ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू आणि सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणारा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने आपल्या कारकीर्दीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अलीकडेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मॅक्सवेलने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या चुका उघड केल्या आणि सांगितले की, त्याने आपली प्रतिभा आणि कौशल्ये हलक्यात घेतली आहेत. त्यामुळे त्याला जास्त यश संपादन करता आले नसल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे.
या व्हिडिओमध्ये मॅक्सवेल म्हणाला आहे की, “कदाचित काही टूर्नामेंट्स मी जितक्या गांभीर्याने घ्यायला हव्या होत्या, तितक्या गांभीर्याने घेतल्या नाही. मी कदाचित माझा थोडा वेळ वाया घालवला आहे. मी सर्वोत्कृष्ट होण्यासाठी लक्ष केंद्रित केले नाही. मी कदाचित तयार नव्हतो, आणि मी म्हटल्याप्रमाणे, हे सर्व मी घेतलेले अनुभव आहेत, जे मला गेल्या अनेक वर्षांमध्ये आले आहेत.”
Glenn Maxwell opens up about the biggest mistake of his career and the lessons learnt from them on the #RCBPodcast powered by @KotakBankLtd.
Head to our YouTube channel to watch the full episode 🙌#PlayBold #WeAreChallengers #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/rV0YYtrgrX
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 3, 2022
मॅक्सवेलने त्याच्या कारकीर्दीत वेगवेगळ्या स्थानांवर फलंदाजी करणाऱ्या उजव्या हाताचा फलंदाज खेळाला पूर्ण न्याय देण्यात अपयशी ठरला आहे. सातत्य नसणे ही त्याच्या खेळातील सर्वात मोठी कमजोरी आहे, असे देखील मॅक्सवेलने या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. शिवाय याच कारणामुळे आपल्याला आयपीएलमध्ये अनेकदा संघ बदलावा लागला असल्याची खंतही त्याने व्यक्त केली.
दरम्यान, आरसीबीने २०२१च्या लिलावामध्ये १४.२५ कोटी इतकी मोठी रक्कम देत संघात सामील करून घेतले होते. त्याने आयपीएलच्या २०२१ च्या हंगामात ४२.७५च्या सरासरीने आणि १४४.१०च्या स्ट्राईक रेटने ५१३ धावा केल्या. त्यानंतर या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात २७.३६च्या सरासरीने आणि १६९.१०च्या स्ट्राईक रेटने ३०१ धावा करत चांगली कामगिरी केली. तसेच, त्याने ६ विकेट्सही घेतल्या. त्यामुळे मॅक्सवेलने आरसीबीसाठी पैसा वसूल काम केले असल्याचे स्पष्ट होत आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘भारताचा संघ पाकिस्तानवर पडणार भारी’, हरभजनला उत्तर देताना टीम इंडियाबद्दल अख्तरचे मोठे विधान
क्रिकेटचे उज्ज्वल भविष्य! विलियम्सनची नक्कल करताना दिसला चिमुकला, Video Viral
टी२० क्रिकेटमध्ये ‘हा’ संघ अवघ्या ८ धावांवर परतला तंबूत, मग विरोधी संघानेही ७ चेंडूत जिंकला सामना