जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. आयपीएलच्या या पुढील हंगामात न खेळण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाचा कसोटी व वनडे कर्णधार पॅट कमिन्सने घेतला. ऍशेस मालिकेसाठी तंदुरुस्त राहण्याकरिता आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटलेले. त्याच्या या निर्णयावर आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्रा याने महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल या सर्वात मोठ्या टी20 लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील क्रिकेटपटू आतुर असतात. मात्र, आपल्या व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे कमिन्सने पुढील हंगाम न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने स्पष्टीकरण देत म्हटलेले,
“पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. त्यातच ऍशेस मालिका व वनडे विश्वचषक होणार असल्याने स्वतःवरील ताण कमी करण्यासाठी मी आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला.”
त्याच्या या निर्णयाचे समर्थन करताना मॅकग्रा म्हणाला,
“कमिन्सने आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला याचे मी कौतुक करतो. तोच दीड दोन महिन्यांचा कालावधी तुमच्यासाठी ऑफ सीजन असतो. यामध्ये पुरेशी विश्रांती घ्या, तंदुरुस्त व्हा व पुढील हंगामाची चांगली तयारी करा. तुम्ही अशी गाडी आहे जिच्यात कधी इंधन भरावे लागत नाही. एका विशिष्ट काळानंतर तुम्ही नक्कीच थकता.”
कमिन्ससोबतच ऑस्ट्रेलियाचा दुसरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने देखील आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार्क 2015 नंतर आयपीएल मध्ये सहभागी झाला नाही. 2018 मध्ये कोलकाताने त्याला करारबद्ध केले होते. मात्र, तो हंगाम सुरू होण्याआधी दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडलेला. त्यानंतर त्याने लिलावातही आपले नाव दिले नाही.
(Glenn McGrath Backs Pat Cummins For Pulling Name From IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘या’ खेळाडूचा नादच खुळा! वनडे ओपनर म्हणून ‘मोठ्या’ विक्रमात सचिन-रोहित अन् धवनलाही पछाडलं
‘बर्थडे बॉय’ सुरेश रैनाबद्दल ‘या’ खास 10 गोष्टी माहित आहेत का?