ऑस्ट्रेलियात नुकताच टी20 विश्वचषक खेळला गेला. या विश्वचषकाला चाहत्यांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. विश्वचषकातील जवळपास प्रत्येक सामन्याला चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. मात्र, त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. प्रेक्षकांनी मैदानाकडे पाठ फिरवलेली दिसली. आता याबाबतच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्रा याने महत्त्वाचे विधान केले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी पार पडलेल्या टी20 विश्वचषकात प्रत्येक सामन्यात चाहते मैदानावर येताना दिसले. जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर एकही सामना 80 हजार पेक्षा कमी क्षमतेने झाला नाही. मात्र, त्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी याच मैदानावर झालेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड वनडे सामना पाहण्यासाठी केवळ 4000 लोक उपस्थित होते. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी या सामन्याकडे पाठ फिरवल्याने, ग्लेन मॅकग्रा याने वनडे क्रिकेटच्या भवितव्याबाबत मोठे वक्तव्य केले.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडेनंतर बोलताना मॅकग्रा म्हणाला,
“दोन दर्जेदार संघातील हा सामना पाहण्यासाठी इतके कमी लोक आले हे पाहून निराश झालो. वनडे क्रिकेट सध्या संकटात आहे. ते आपल्याला वाचवावे लागेल. मेलबर्न सारख्या खेळांची परंपरा असलेल्या शहरात असे घडले दुर्दैवी आहे. आपल्याला प्रत्येक सामन्याचा सन्मान करायला हवा. टी20 क्रिकेट वेगाने वाढत आहे. तर, कसोटी क्रिकेटही आपल्या जागी जबरदस्त आहे.”
मागील काही काळापासून वनडे क्रिकेटच्या भविष्याबद्दल अनेक चर्चा होताना दिसत आहेत. काही बड्या खेळाडूंनी वनडे क्रिकेटला राम राम देखील केला आहे. तसेच अनेक दिग्गजांनी वनडे क्रिकेट 40 षटकांपर्यंत मर्यादित करावे असा पर्याय देखील सुचवलेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरेरे! भारताने सामना गमावताच ट्विटरवर तिखट प्रतिक्रिया, नेटकरी म्हणाले, ‘हा भारत विराट आणि बुमराहशिवाय…’
आता सुट्टी नाही! उमरान मलिकने वनडेतील पहिल्या चेंडूपासून सुरू केली दहशद, वेगातील सातत्य मन जिंकणारे