ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने आशा व्यक्त केली आहे की, अनुभवी फिरकी गोलंदाज नेथन लायन कसोटी विकेट्सच्या बाबतीत त्याला मागे टाकू शकेल. मॅकग्राच्या मते, नेथन लायनमध्ये इतकी क्षमता आहे की, तो कसोटी क्रिकेटमधील विकेट्सचा विक्रम मोडेल.
ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) आहे. त्याने 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 विकेट्स घेतल्या आहेत. नेथन लायन (Nathan Lyon) याने 500 विकेट्सचा आकडाही गाठला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्यात त्याने 500 विकेट्सचा आकडा गाठला आहे.
सिडनी येथे पिंक बॉल कसोटी सामन्यापूर्वी ग्लेन मॅकग्राने नेथन लायनबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच बनवले जातात. नेथन लायनने माझा विक्रम मोडला तर त्याचे श्रेय त्याला द्यायला हवे. त्याची कारकीर्द खूपच चमकदार राहिली आहे. मी त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. मला आशा आहे की, तो मला मागे टाकेल. असे असूनही वेगवान गोलंदाजाकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम माझ्याच नावावर राहील.
शेन वॉर्न (Shane Warne) याने 2019 ऍशेस दरम्यान भाकीत केले होते की, नेथन लायन कसोटी क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेऊ शकतो आणि ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याचाही विश्वास आहे की, लायन हा पराक्रम करू शकतो आणि शेन वॉर्नच्या विक्रमाशी बरोबरी करू शकतो. गेल्या वर्षी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही नॅथन लायन होता. 2023 मध्ये त्याने 10 कसोटी सामने खेळले आणि या काळात त्याने 47 विकेट्स घेतल्या. 64 धावांत 8 विकेट्स ही त्याची या प्रकारामधील सर्वोत्तम कामगिरी आहे. आता तो ग्लेन मॅकग्राला मागे टाकतो की नाही हे पाहायचे आहे.
(Former legend’s big prediction for Nathan Lyon says I hope he’s my)
हेही वाचा
Rohit Sharma । भारताचा टी-20 कर्णधार रोहितच! आगामी मालिकेसह विश्वचषकात करणार संघाचे नेतृत्व
कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीआधी वॉर्नर टेंशनमध्ये! मौल्यवान बॅगी ग्रीन कॅपची चोरी