---Advertisement---

हजार विकेट घेणारा दिग्गज म्हणतोय, “अजूनही वनडे क्रिकेटच माझं फेवरेट”

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 12:30 AM
ind v wi
---Advertisement---

आजकाल क्रिकेटमध्ये ज्या गोष्टीची सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे वनडे क्रिकेट. वनडे क्रिकेटची लोकप्रियता, उपयुक्तता आणि भविष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तानचे महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी तर क्रिकेटचा हा प्रकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. या दरम्यान काही माजी क्रिकेटपटू असे आहेत ज्यांना हा प्रकार हवा आहे. त्यांनी फक्त या प्रकारात काही बदल करणे काळाची गरज असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने वनडे क्रिकेटबाबत एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना मॅकग्रा वनडे क्रिकेटबाबत म्हणाला,

“मला नेहमीच परंपरागत क्रिकेट आवडत आले आहे. त्यामुळे मला कसोटी आणि वनडे आवडतात. कसोटी क्रिकेट अजूनही माझे सर्वाधिक पसंतीचे आहे. मला आशा आहे की ते खूप चांगल्या स्थितीत आहे. वनडे क्रिकेटचा विचार केला तर, जोपर्यंत धावा बनत आहेत तोपर्यंत हे रोमांचकच असेल. वनडे क्रिकेटचे भविष्य काय आहे हे पाहणे मनोरंजक असेल. वनडे क्रिकेट रोमांचक बनवावे लागेल, कारण त्यात काही आव्हाने आहेत. वनडे आणि टी२० क्रिकेट वेगवेगळे आहेत. टी२० मध्ये खूप पैसा आहे आणि म्हणूनच अनेक तरुण फक्त टी२० खेळण्यास प्राधान्य देतात.”

ही सर्व चर्चा इंग्लंडचा कसोटी कर्णधार व २०१९ विश्वचषकाचा नायक ठरलेल्या बेन‌ स्टोक्सने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सुरू झाली होती. त्याने अतिक्रिकेटचे कारण सांगत ३१ व्या वर्षीच वनडे क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतलेला. इतरही काही खेळाडूंनी सध्या जास्त प्रमाणात क्रिकेट होत असल्याचे कबूल केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तब्बल ८७ हजार प्रेक्षकांपुढे महिला फुलबॉलरने काढला टी-शर्ट, ‘स्पोर्ट्स ब्रा’वरचे सेलिब्रेशन व्हायरल

भारीच! तीन महिन्यात दोन वेळा भारत-पाकिस्तान आमने-सामने, चाहत्यांसाठी क्रिकेटची मोठी पर्वणी

भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणजे ‘टू इन वन’ मटेरियल! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---