---Advertisement---

तब्बल ८७ हजार प्रेक्षकांपुढे महिला फुलबॉलरने काढला टी-शर्ट, ‘स्पोर्ट्स ब्रा’वरचे सेलिब्रेशन व्हायरल

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 6:47 PM
---Advertisement---

युरोपियन चॅम्पियनशीपमध्ये मंगळवारी (०२ ऑगस्ट) लंडनच्या वेंबली स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध जर्मनी महिला फुटबॉल संघात आमना सामना झाला. तब्बल ८७ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने शेवटच्या क्षणी विजय मिळवला. त्यांनी जर्मनीला २-१ ने पराभूत करत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या सामना विजयानंतर इंग्लंडच्या फुटबॉलपटू क्लो कॅली हिने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

कॅलीने इंग्लंड संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर आपला शर्ट काढून सेलिब्रेशन केले आहे. तिच्या या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भारतीय क्रिकेटमध्ये विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली याचे शर्टविना केलेले सेलिब्रेशन आजही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. लॉर्ड्स येथील नेटवेस्ट ट्रॉफीतील ऐतिहासिक विजयानंतर त्याने अंगावरील शर्ट काढत सेलिब्रेशन केले होते परंतु आता महिला फुटबॉलपटू कॅलीने हे सेलिब्रेशन करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी तिच्या या सेलिब्रेशनला महिला सशक्तीकरणाशी जोडले आहे.

https://twitter.com/AbraAbraCadaver/status/1554368169699147777?s=20&t=EDCAhqzrq9KyDF_6KguRtw

एका ट्वीटर वापरकर्त्याने ट्वीट करत लिहिले आहे की, “हा शर्टविना स्पोर्ट्स ब्रामध्ये असलेला फोटो सानदार आहे. हा फोटो महिलांचे शरीर फक्त शारिरीक संबंध ठेवण्यासाठी किंवा पुरुषांना दाखवण्यासाठी नसते, तर ती काय-काय कमाल करू शकते हे दाखवण्यासाठी असते. लाजबाव.”

तसेच कॅलीच्या या सेलिब्रेशनला १९९९ च्या विश्वचषक अंतिम सामन्यातील अमेरिकी फुटबॉलपटू ब्रेंडी चेस्टेन हिच्याशीही जोडले जात आहे. तिने अंतिम सामन्यात पेनाल्टीसह विजय मिळवून दिल्यानंतर अशाच अंदाजात शर्ट काढून तो हवेत फिरवत आपला आनंद व्यक्त केला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---