---Advertisement---

दु:खद! ४००० धावा आणि १२० पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटरचे निधन

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 4:40 PM
Phil-Carlson
---Advertisement---

क्रिकेटविश्वातून एक दु:खद बातमी पुढे येत आहे. मंगळवारी (०२ ऑगस्ट) ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू फिल कार्लसन यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले आहे. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी प्रतिनिधित्त्व केलेल्या क्विन्सलँड संघाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

कार्लसन (Phill Carlson) यांच्या मृत्यूनंतर क्लिन्सलँड क्लबचे अध्यक्ष त्यांना श्रद्धांजली देताना म्हणाले की, “कार्लसन यांनी क्विन्सलँड संघासाठी कित्येक उत्कृष्ट खेळी खेळल्या होत्या. ते क्रिकेटविश्वातील एक लोकप्रिय आणि मोठा चाहतावर्ग असलेले क्रिकेटपटू होते. क्वीन्सलँड क्रिकेटर्स क्लबमधील पदांवरून ते या खेळाचे मोठे समर्थक होते. तसेच क्रिकेटशी जोडले गेल्याने ते फार आनंदीही होते. आम्ही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करतो आणि त्यांचे कुटुंबीय व मित्रांप्रती सहानुभूती व्यक्त करतो.”

अशी राहिली फिल कार्लसन यांची क्रिकेट कारकिर्द
ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू कार्लसन (Phill Carlson Died At 70) यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४ हजारपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यांनी क्लिन्सलँड क्लबकडून  ९१ प्रथम श्रेणी सामने खेळताना ४१६७ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या ५ शतके आणि १९ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच त्यांनी गोलंदाजी करताना १२४ विकेट्सही घेतल्या होत्या.

१९६९ ते ७० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत शेफील्ड शील्ड स्पर्धेत १८ वर्षांच्या वयात त्यांनी शतक ठोकले होते. त्यांच्यासाठी क्विन्सलँड संघाकडून १९७७-७८ आणि १९७८-७९ चे हंगाम सर्वोत्कृष्ट राहिले. या हंगामात त्यांनी अनुक्रमे ४५.४६ व ४०.३३ च्या सरासरीने धावा कुटल्या होत्या.

ऑस्ट्रेलिया संघाकडून मात्र त्यांना फार कमी सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून ४ वनडे आणि २ कसोटी सामने खेळले होते. वनडे क्रिकेटमध्ये ४ सामने खेळताना त्यांनी ११ धावा आणि २ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच २ कसोटी सामने खेळताना २३ धावा आणि २ विकेट्स घेतल्या होत्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी मिळवणारा माही आता कॉमनवेल्थमध्येही ठरतोय ‘एक्स फॅक्टर’

टी२० विश्वचषकासाठी खतरनाक योजना आखतायत भारताचे प्रशिक्षक, गोलंदाजांची बनवतायत फौज

भारतीय क्रिकेटरचे इंस्टाग्राम हॅक, बायकोबरोबरचे पर्सनल चॅट व्हायरल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---