भारताचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल सामना खेळलत नसला तरी सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असतो. तसेच काहीसे यावेळी सुद्धा पाहायला मिळत आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० संघात सध्या खेळत नसला तरी चहल सोशल मिडीयावर ट्रेंड होत आहे. याचे कारण म्हणजे त्याच्या इंस्टाग्राम वरील पर्संनल चॅट लीक झालेल आहेत.
चहलच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या मेसेज सेक्शनचा एक स्क्रिनशसॉट सध्या जोरात व्हायरल होत आहे. यामध्ये प्रामुख्याने त्याची पत्नी धनश्री हिचा मेसेज सर्वात वर दिसत आहे. वास्तविक, चहल सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी संघाचा भाग आहे. राजस्थान रॉयल्सने हा पराक्रम केला आहे. आयपीएल२०२२ दरम्यान, चहलने राजस्थान रॉयल्सचे खाते हॅक केले आणि संघातील खेळाडूंना अनेक संदेश पाठवले. त्याचा बदला राजस्थान रॉयल्सने घेतला आहे.
hacked @yuzi_chahal’s Instagram. Hisaab barabar ???????? pic.twitter.com/dBc5Qhc6bb
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 2, 2022
तरीही हे सर्व मनोरंजनासाठी केले गेले. राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या चहलच्या इन्स्टा चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये, त्याची पत्नी धनश्री वर्मा चहल, संजू सॅमसन, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, जोस बटलर, भारतीय क्रिकेट संघ आणि रोहित शर्मा यांच्या खात्यावरील शेवटचे संदेश दृश्यमान आहेत. धनश्रीने ‘तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये परत या’ असे लिहिले आहे, तर धोनीने चहलचे कौतुक करणारा मेसेज केलल्याचे दिसत आहे. या सगळ्यात रोहित शर्माचा मेसेजही काही कमी मजेशीर आहे, त्याने थेट ‘खाते हटवा’ असे लिहिले आहे.
दरम्यान, या फोटोमध्ये दिसत असलेले काही मेसेेज अनपेक्षित आहेत. उदाहरणार्थ भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोशल मिडीयावर अगदी तुरळक वेळा ऍक्टीव्ह असल्याचे पाहायला मिळते. अशात या फोटोमध्ये धोनीचा मेसेज पाहायलला मिळणे अनपेक्षित होते. त्यावरून हा फोटो एडिट करून व्हायरल केला असल्याचे स्पष्ट होत असले. तरी राजस्थान रॉयल्स संघाच्या सोशल मिडीया हँडल करणाऱ्या टीमने चहलसोबत केलेल्या या मस्तीने सोशल मिडीयावर चांगललाच धुमाकूळल घातला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
टी२०मध्ये मॅकॉय तर वनडे अन् टेस्टमध्ये ‘या’ गोलंदाजांनी भारतावर आणलेली गुडघे टेकायची वेळ
एकाच सामन्यात पाहायला मिळाले तीन अर्शदीप सिंग, एक ओरिजनल तर दोघांची ‘पगडी’ गायब






