ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (2022 T20 World Cup) शनिवारी (29 ऑक्टोबर) पहिला सामना अ गटातील न्यूझीलंड व श्रीलंका (NZvSL) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव सुरुवातीला घसरल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) च्या शतकाने उभा राहिला. त्याच्या कारकिर्दीतील हे दुसरे आंतरराष्ट्रीय टी20 शतक ठरले. (Glenn Phillips Century)
New Zealand post a competitive target after Glenn Phillips’ onslaught 💪#T20WorldCup | #NZvSL | 📝: https://t.co/7YevVnQdfG pic.twitter.com/8uENq0sZHQ
— ICC (@ICC) October 29, 2022
अ गटात अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला ताबडतोब सुरुवात देणारे डेवॉन कॉनवे व फिन ऍलन (Finn Allen) यांनी संघासाठी डावाची सुरुवात केली. मात्र, हे दोन्ही सलामीवीर तिसऱ्या षटकात 7 धावा धालफलकावर असताना तंबूत परतले.
त्यावेळी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लेन फिलिप्सने सावध सुरुवात केली. 12 धावांवर असताना त्याचा एक सोपा झेल निसंकाने सोडला. मात्र, त्यानंतर त्याने मागे वळून न पाहता न्यूझीलंडच्या डावाची जबाबदारी त्याने खराब चेंडूंचा समाचार घेत व चांगल्या चेंडूंचा सन्मान करत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेरच्या काही षटकांमध्ये धावांचा वेग वाढवत त्याने 61 चेंडूवर आपल्या कारकिर्दीतील दुसरे टी20 शतक पूर्ण केले. त्यामध्ये 10 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याने 64 चेंडूवर 104 धावांची खेळी केली. टी20 विश्वचषकात चौथ्या अथवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावणारा फिलिप्स पहिला फलंदाज बनला.
एकवेळ धावांसाठी संघर्ष करत असलेल्या न्यूझीलंडने फिलिप्सच्या शतकाने 167 धावा केल्या. फिलिप्स व्यतिरिक्त मिचेलने 22 व सॅंटनरने 11 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेसाठी रजिथाने सर्वाधिक दोन बळी टिपले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तानकडे खराब कर्णधार’, बाबर आझमबद्दल बोलताना घसरली शोएब अख्तरची जीभ
सामन्यापूर्वी पत्नीचा ‘हा’ नियम पाळतो सूर्यकुमार, फलंदाजीला उतरताच करतो गोलंदाजांचं काम तमाम