ऑस्ट्रेलियात पुरूष क्रिकेट संघांचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळला जात आहे. या स्पर्धेत शनिवारी (29 ऑक्टोबर) सुपर 12च्या पहिल्या फेरीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (NZvSL) यांच्यात खेळला गेला. न्यूझीलंडचा फलंदाज ग्लेन फिलिप्स याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकले. त्याच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक होत असताना याच सामन्यातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी त्याने स्पिरिट ऑफ क्रिकेट अर्थातच खिलाडूवृत्ती याचा एक उत्कृष्ट नमुना सादर केला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याने घेतलेला निर्णय चुकला की काय वाटत होते, कारण न्यूझीलंडचे पहिले तीन फलंदाज एकेरी धावा करत तंबूत परतले. यामुळे पॉवरप्लेमध्ये त्यांची स्थिती 3 बाद 25 धावसंख्या अशी झाली होती. त्याचक्षणी ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) याच्या बॅटमधून शतक बाहेर पडले. त्याने 64 चेंडूत 104 धावा केल्या.
नुकतेच पाकिस्तानचा मोहम्मद वसीम याने झिम्बाब्वे विरुद्ध क्रीझ सोडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यातच किवी फलंदाज फिलिप्सने श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या षटकात एकेरी धाव घेण्यासाठी जी नामी शक्कल लढवली त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लाहिरू कुमारा जेव्हा गोलंदाजी करत होता, तेव्हा नॉन-स्ट्रायकर एंडवर असलेला फिलिप्स एखाद्या धावपटूसारखा तयारीत दिसला. तो धाव घेण्यासाठी चेंडू टाकण्याआधी क्रीझच्या पुढे आला नाही तर खाली वाकला. हा व्हिडिओ नॉन-स्ट्रायकरच्या फलंदाजासाठी फायद्याचा ठरणार आहे.
जेव्हापासून भारताच्या दीप्ति शर्माने इंग्लंडच्या चार्ली डीन हिला मकंडींगने बाद केले. तेव्हापासून मंकडींग शब्द चर्चेत आला आणि नॉन-स्ट्रायकरचा फलंदाज कसा नियम मोडतो याची अनेक उदाहरणे दिसली. ते न होण्यासाठी जर नॉन-स्ट्रायकरच्या फलंदाजांनी फिलिप्सचा मार्ग स्विकारला तर नवल नसेल.
https://www.instagram.com/reel/CkSyJwgOgBq/?utm_source=ig_web_copy_link
सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात फिलिप्सने त्याच्या खेळीत 162.50च्या स्ट्राईक रेटने खेळताना 10 चौकार आणि 4 षटकारांसह त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 मधील दुसरे शतक ठरले. बांगलादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या रिली रॉसौचे 109 धावा नंतरचे हे या स्पर्धेतील दुसरे शतक होते. तसेच हे टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील केवळ 11वे शतक होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता पाकिस्तानी चाहतेच उडवू लागले आपल्या संघाची खिल्ली; म्हणाले…
शतक एक विक्रम अनेक! फिलिप्सच्या सेंच्युरीने रचले दोन रेकॉर्ड, एकात बनलाय जगातील पहिला फलंदाज