---Advertisement---

अफलातून! न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने डाइव्ह मारत घेतला नेत्रदीपक झेल, पाहा व्हिडिओ

On: शनिवार, जुलै 10, 2021 3:55 PM
---Advertisement---

आजकाल क्रिकेटमध्ये खेळाडूंकडून अफलातून क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन होत असते. खेळाडूंची फिटनेस चांगली असल्याने ते झेल घेण्यासाठी मोठी उडी घेताना कसलीही पर्वा करत नसल्याचे दिसते. त्यामुळे अनेकदा अफलातून झेल क्षेत्ररक्षकांनी घेतलेले दिसतात. नुकताच इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी२० ब्लास्टमध्ये न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने अविश्वसनीय झेल घेतला आहे.

गुरुवारी ग्लुस्टरशायर विरुद्ध मिडलसेक्स संघात सामना झाला. या सामन्यात ग्लुस्टरशायरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १७१ धावा करत मिडलसेक्सला १७२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मिडलसेक्सकडून सॅम रॉब्सन आणि स्टिफन स्किनाजी सलामीला फलंदाजीला उतरले.

पण तिसऱ्या षटकात मॅट टेलरने टाकलेल्या चेंडूवर स्किनाजीने ऑफ साईडला हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू चौकार जाईल असे वाटले होते. पण बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या फिलिप्सने पळत जात आपल्या डाव्या बाजूला झेप घेत दोन्ही हातांनी तो चेंडू पकडला. त्यामुळे स्किनाजी बाद झाला. फिलिप्सने घेतलेल्या या झेलाचे सध्या खूप कौतुक होत आहे. त्याच्या झेलाचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

या सामन्यात मिडलसेक्सला २० षटकांत ८ बाद १६१ धावाच करता आल्याने ग्लुस्टरशायरने १० धावांनी विजय मिळवला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट न्यूझीलंडकडून खेळतो फिलिप्स 
फिलिप्सचा जन्म जरी दक्षिण आफ्रिकेत झाला असला, तरी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट न्यूझीलंडकडून खेळतो. तो ५ वर्षांचा असताना त्याचे कुटुंबिय दक्षिण आफ्रिकेतून ऑकलंडला स्थायिक झाले होते. त्यामुळे फिलिप्सवर क्रिकेटचे सर्व संस्कार ऑकलंडमध्ये झाले. २४ वर्षीय फिलिप्सने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १ कसोटी आणि २५ टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ५२ आणि टी२०मध्ये ५०५ धावा केल्या आहेत.

टी२० ब्लास्टमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फिलिप्स 
यावर्षीच्या टी२० ब्लास्टमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत फिलिप्स सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १० सामन्यांत ६०.४३ सामन्यात ४२३ धावा केल्या आहेत. यात त्याने ३ अर्धशतके केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

क्रिकेट ब्रेकिंग! बीसीसीआयकडून भारत-श्रीलंका मालिकेच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब; पाहा नवे टाईमटेबल

कोरोनाची मार! भारत-श्रीलंका वेळापत्रकात पुन्हा बदल, जय शहा यांनी सांगितली अधिकृत तारिख

पाकिस्तानी अंपायरने चुकीचा निर्णय देऊन देखील ‘लिटल मास्टर’ने मोडला होता ब्रॅडमन यांचा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---