---Advertisement---

युवा फलंदाज अग्नीदेव चोप्राचा डबल धमाका, ठोकले आणखी एक द्विशतक

On: सोमवार, ऑक्टोबर 28, 2024 8:35 PM
agnidev chopra
---Advertisement---

सध्या रणजी ट्रॉफीचा हंगाम जोरात सुरू आहे. जिथे देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिभा समोर येतेय. ज्यामध्ये युवा फलंदाज अग्निदेव चोप्रा (Agnidev Chopra) भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये आगीसारखा चमकत आहे. बॉलिवूड दिग्दर्शकाचा मुलगा असलेल्या अग्निदेवचा जबरदस्त फॉर्म रणजीमध्ये सुरूच असून, त्याने आणखी एक द्विशतक (Agnidev Chopra Double Century) झळकावले आहे.

रणजी ट्रॉफी 2024-25 हंगामात मिझोरामकडून खेळणाऱ्या अग्निदेव चोप्राने प्लेट गटातील तिसऱ्या सामन्यात आणखी एक स्फोटक द्विशतक झळकावले. मणिपूरविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात पहिल्या डावात तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या अग्नीने 269 चेंडूंत 29 चौकार आणि 1 षटकारासह 218 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या युवा फलंदाजाचे हे सलग दुसरे द्विशतक असून सलग तिसरे शतक आहे.

मुंबईत क्रिकेटमध्ये धडे गिरवलेल्या या युवा प्रतिभावान फलंदाजाने रणजीमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या हंगामात तो तिसरा सामना खेळत असून, त्याने आतापर्यंत 3 शतके झळकावली आहेत. या हंगामात आतापर्यंत त्याने 3 सामन्यांच्या 5 डावात सुमारे 161 च्या सरासरीने 646 धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी पदार्पण करणाऱ्या या फलंदाजाने आतापर्यंत 9 सामन्यांच्या 17 डावांमध्ये 93.23 च्या सरासरीने 1585 धावा केल्या असून, ज्यामध्ये त्याने 8 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत.

चित्रपट निर्माते व दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा तो मुलगा आहे आहे. गेल्या रणजी सामन्यात पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर दुसऱ्या डावात द्विशतक झळकावले होते. त्यानंतर या सामन्यात त्याने सलग दुसरे द्विशतक झळकावले. वडील मोठे चित्रपट निर्माते असूनही, अग्नी याने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो आपली प्रतिभा सिद्ध करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2025; केकेआर ‘या’ 5 खेळाडूंना करणार रिटेन? कर्णधाराचा पत्ता कटणार
AUS vs PAK; टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, पण कर्णधाराचीच नाही केली घोषणा!
पंत नाही तर ‘हा’ होता, बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी जिंकवणारा खरा हीरो, दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---