ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान (Australia Vs Pakistan) संघात आगामी 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली. पण ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेसाठी आपला कर्णधार अद्याप घोषित केला नाही.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान (Australia vs Pakistan) संघात (4 नोव्हेंबर) पासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे, त्यानंतर दोन्ही संघ (14 नोव्हेंबर) पासून सुरू होणाऱ्या टी20 मालिकेत आमने-सामने येणार आहेत. या टी20 मालिकेतील शेवटचा सामना (18 नोव्हेंबर) रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत (Australia vs India) संघात (22 नोव्हेंबर) पासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा टी20 संघाचा कर्णधार मिचेल मार्श (Mitchell Marsh), ट्रॅव्हिस हेड (Travis Head) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) या खेळाडूंना विश्रांती दिल्याने ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी अद्याप कर्णधाराची नियुक्ती केली नाही. ऑस्ट्रेलियाने सोमवारी (28 ऑक्टोबर) रोजी जाहीर केलेल्या संघातील एकाही खेळाडूने याआधी कोणत्याही फॉरमॅटमध्ये आपल्या देशाचे नेतृत्व केले नाही.
पाकिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ- शॉन ॲबॉट, जेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नाथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, ॲडम झाम्पा
महत्त्वाच्या बातम्या-
पंत नाही तर ‘हा’ होता, बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी जिंकवणारा खरा हीरो, दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!
IND vs NZ; 24 वर्षांनंतर भारतीय संघाच्या नावावर होऊ शकतो, ‘हा’ नकोसा रेकाॅर्ड!
IND vs NZ; मुंबईच्या मैदानावर जयस्वालच्या नावावर होणार ‘हा’ धमाकेदार रेकाॅर्ड?