क्रोएशियाचा स्टार स्ट्रायकर मारियो मॅंडझुकीचने नंतर आता गोलकीपर डॅनियल सुबॅसिचनेही आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. २१वा फिफा विश्वचषक झाल्यावर क्रोएशियाच्या तीन फुटबॉलपटूंनी आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर पडले आहे.
क्रोएशियाचा माजी कर्णधार आणि मिडफिल्डर वेड्रान चोरलुका यानेही आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून याच महिन्यात निवृत्ती घेतली आहे.
🥈👋
"What's important is that I am a fulfilled, happy man who played for his country & wore the most beautiful shirt in the world."🇭🇷@HNS_CFF penalty shoot-out hero @SubasicDanijel follows Mario Mandzukic & Vedran Corluka in calling time on his Croatia career post-#WorldCup pic.twitter.com/eQLp7f4zwD
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) August 15, 2018
क्रोएशिया ४४ सामन्यात खेळणाऱ्या सुबॅसिचने रशियात झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत डेन्मार्क विरुद्ध महत्त्वाची भुमिका निभावली होती. यावेळी त्याने तीन पेनाल्टी रोखल्या होत्या.
या तीन पेनाल्टी रोखत सुबॅसिचने पोर्तुगीज गोलकिपर रिकार्डोची बरोबरी केली. रिकार्डोने २००६च्या फिफा विश्वचषकात ही कामगिरी केली
सुबॅसिचने इंस्टाग्रामवरून चाहत्यांसाठी संदेश दिला. यामध्ये त्याने निवृत्ती घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
https://www.instagram.com/p/BmfqkBKH5z7/?utm_source=ig_web_copy_link
“१० वर्षे या क्रोएशिया संघासाठी खेळलो तर हीच योग्य वेळ आहे थांबण्याची”, असे सुबॅसिच या पत्रात म्हणाला.
“मी फिफा विश्वचषकाआधीच हा निर्णय घेतला होता. अंतिम सामन्यात खेळणे हे माझे स्वप्न होते ते पूर्ण झाले याचा आनंद आहे”, असेही तो पुढे म्हणाला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–गॅरेथ बॅलेच्या नाही तर रोनाल्डोच्या बायसिकल कीकला युरोचे नामांकन
–स्टेडियम रिकामे तरी प्रीमियर लीगचे क्लब फायद्यात