औरंगाबाद । एड्युरन्स् मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स् सनराईज् इएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत आयुष भट, अर्जुन गोहड, दक्ष अगरवाल, दिप मुनिम, जस्मित दुहान, युवान नांदल, सुखप्रित झोजा, अदित्य राठी व अजय सिंग यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस् कॉम्पलेक्स् येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकात कवीन कार्तिकचा 6-0, 6-4 असा सहज पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. तिस-या मानांकीत दिप मुनिमने जासन डेव्हिडचा 6-3, 6-1 असा तर चौथ्या मानांकीत अर्जुन गोहडने मानस धामनेचा 6-1, 6-3 असा एकतर्फी लढतीत पराभव करत आगेकुच केली. बाराव्या मानांकीत दक्ष अगरवालने परम सिंगचा 6-1, 6-0 असा सहज पराभव केला. एकतर्फी झालेल्या लढतींमध्ये सातव्या मानांकीत सुखप्रित झोजाने अदिथ अमरनाथचा 6-1, 6-0 असा, सहाव्या मानांकीत अदित्य राठीने अधिरीत अवलचा 6-2, 6-2 असा तर पाचव्या मानांकीत अजय सिंगने ऋषिकेश संकाराचा 6-1, 6-3 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचे उद्घाटन एड्युरन्स् ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका वर्षा जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एड्युरन्स्चे सुरक्षा विभागाचे प्रमुख व सीएसआर संजय दत्ता, कुमकुम चौधरी, एआयटीए सुपरवायझर वैशाली शेकटकर, आशुतोष मिश्रा, डॉ.अश्विनी जैस्वाल, गजेंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली फेरी- मुले
आयुष भट(1) वि.वि कवीन कार्तिक 6-0, 6-4
वंश नांदल(16) वि.वि दक्ष प्रसाद 6-2, 7-6(5)
जस्मित दुहान(9) वि.वि प्रज्वल तेवारी 6-1, 7-5
युवान नांदल(8) वि.वि कंधावेल महालिंगम 6-4, 6-1
अर्जुन गोहड(4) वि.वि मानस धामने 6-1, 6-3
अग्रिया यादव(13) वि.वि नाव्या वर्मा 6-1, 6-3
दिप मुनिम(3) वि.वि जासन डेव्हिड 6-3, 6-1
सुखप्रित झोजा(7) वि.वि अदिथ अमरनाथ 6-1, 6-0
अदित्य राठी(6) वि.वि अधिरीत अवल 6-2, 6-2
अजय सिंग(5) वि.वि ऋषिकेश संकारा 6-1, 6-3
अरुनवा मजुमदार(11) वि.वि मनन नाथ 6-3, 6-2
दक्ष अगरवाल(12) वि.वि परम सिंग 6-1, 6-0
रोहित मोनिल(15) वि.वि अर्या भट्टाचार्य 6-2, 6-0
रोनिन लोटलीकर(14) वि.वि रोहन अगरवाल 6-1, 6-2
त्रिशूल जगदीश वि.वि.ईशान देगमवार 6-3, 6-3