पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत रोहन थोरात, मेघना चव्हाण, महिपाल सिंग यांना सुवर्णपदक

पुणे । पुणे महानगरपालिका आणि स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनतर्फे आयोजित पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत शो-जंपिंगमध्ये टॉप स्कोअर प्रकारात रोहन थोरात, ट्रिपल फ्लॅग रेस प्रकारात मेघना चव्हाण आणि बूट अ‍ँड हे प्रकारात महिपाल सिंग सुवर्णपदकाची पटकाविले. याशिवाय जिमखाना प्रकारातील जिलबी रेसमध्ये देखील स्पर्धकांनी सहभाग घेत आपले कौशल्य दाखविले.

दिग्विजय हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमी, शिवसृष्टी, कात्रज आंबेगाव येथे ही स्पर्धा सुरु आहे. शो-जंपिंग टॉप स्कोअर प्रकारात चिल्ड्रन गटात रोहन थोरात (२८० गुण), श्रद्धा वानवे (२१० गुण), आशिष डांगे (१८० गुण) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. तर, ट्रिपल फ्लॅग रेस प्रकारात ज्युनियर गटात मेघना चव्हाण (१८.८४ से.) प्रथम, रोहित थोरात (२६.७७ से.) द्वितीय, तन्मय मोरकर (२७.६३) तृतीय क्रमंक पटकाविला.

बूट अ‍ँड हे प्रकारात ज्युनियर गटात महिपाल सिंग (प्रथम), पृथ्वीराज सरडे (द्वितीय), आकाश कोरदा (तृतीय) यांनी पदके मिळविली. तर, बॉल अ‍ँड बकेट प्रकारात ज्युनियर गटात रोहित थोरात, तन्मय मोरकर, अजिंक्य शिंदे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. रोहित थोरात व रोहन थोरात हे द ग्रीन फिंगर्स स्कूल अकलूज येथील विद्यार्थी असून अनेक वर्षांपासून अश्वारोहणाचा सराव करीत आहेत.

इतर निकाल ।

बॉल अ‍ँड बकेट ।

वयोगट १० ते १२ वर्षे – रोहन थोरात (प्रथम), कार्तीक धनावडे (द्वितीय), उमेश गायकवाड (तृतीय), वयोगट १२ ते १८ वर्षे – वेदांत कदम (प्रथम), अलिशा मोरे (द्वितीय), श्रेयस करपे (तृतीय).

बूट अ‍ँड हे ।

वयोगट १० ते १२ वर्षे – पृथ्वीराज देशमुख, रोहन थोरात (प्रथम), अथर्व शिंदे (द्वितीय) विहान काळोखे (तृतीय).

ट्रिपल फ्लॅग रेस ।

वयोगट १० ते १२ वर्षे – कार्तीक धनावडे, विश्वतेज जगताप (प्रथम), अनुष्का म्हस्के (द्वितीय), उमेश गायकवाड (तृतीय).

You might also like