---Advertisement---

ICC ने महिला वर्ल्ड कपसाठी बक्षीस रकमेत केली ऐतिहासिक वाढ, विजेत्यांना करोडो रुपये जाहीर!

On: सोमवार, सप्टेंबर 1, 2025 2:38 PM
---Advertisement---

महिला वर्ल्ड कप (Women’s World Cup 2025 Prize Money) साठी प्राइज मनी जाहीर केली गेली आहे. या स्पर्धेच्या बक्षीस रकमेत 297% वाढ करण्यात आली आहे. ICC ने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. ICC ने महिला वर्ल्ड कपची प्राइज मनी $13.88 दशलक्ष ठरवली आहे, जी भारतीय रुपयांत 122 कोटींपेक्षा जास्त आहे. ICC अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांच्या या निर्णयामुळे महिला क्रिकेटला वेगळा मान मिळाला आहे.

महिला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमसाठी 4.48 दशलक्ष म्हणजे सुमारे 40 कोटी रुपये बक्षीस ठरवण्यात आले आहे. फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघासाठी 2.24 दशलक्ष म्हणजे सुमारे 20 कोटी रुपये मिळतील.
सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या संघाला सुमारे 10 कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये एका मॅचमध्ये जिंकणाऱ्या संघाला 34,000 म्हणजे सुमारे 30.19 लाख रुपये मिळतील. तसेच पाचवे व सहावे क्रमांक मिळवणाऱ्या संघाला 6.16 कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे.

सातवे व आठवे क्रमांक मिळवणाऱ्या संघाला 2.5 कोटी रुपये मिळतील. ICC ने हेही जाहीर केले आहे की कोणतीही टीम मॅच जिंकली किंवा हरली, प्रत्येक टीमला किमान 2.5 कोटी रुपये मिळणार आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरुषांच्या 2023 वनडे वर्ल्ड कपची प्राइज मनी 10 दशलक्ष होती, जी भारतीय रुपयांत सुमारे 88.29 कोटी रुपये होती.

ICC अध्यक्ष जय शाह म्हणाले, ही घोषणा महिला क्रिकेटच्या प्रवासात एक निर्णायक टप्पा ठरणार आहे. त्यांनी पुढे सांगितले, बक्षीस रकमेतील चारपट वाढ महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण आहे आणि हे दर्शवते की त्याच्या दीर्घकालीन विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचा संदेश साधा आहे, महिला क्रिकेटर खेळाडूंना हे माहिती असायला हवे की जर त्यांनी हा खेळ व्यावसायिक पातळीवर निवडला, तर त्यांच्याशी पुरुषांसारखी वागणूक केली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---