आयपीएलच्या 17 व्या मोसमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या 17 व्या हंगामाची सुरुवात ही रंगारंग कार्यक्रमाने होणार आहे. ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम हा चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर करण्यात आला आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सलामीच्या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कराण चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना फिट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे तो संघात लवकरच सहभागी होऊ शकतो.
याबरोबरच मथीशा याला 6 मार्च रोजी बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. मथीशाला त्यानंतर त्याच्या खात्यातील पू्र्ण ओव्हरही टाकता आल्या नव्हत्या. तसेच मथीशाला या दुखापतीतून बरं होण्यासाठी 2-3 आठवड्याचा कालावधी लागू शकतो असे मीडिया रिपोर्ट्सनुसार सांगण्यात आले होते. पण आता मथीशा पथिराना फिट झाला असून तो लवकरच संघाशी जोडला जाणार आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पाथिराना स्पर्धेतील पहिले 2 किंवा 3 सामने खेळण्याची शक्यता कमी आहे.
अशातच मथीशाने सीएसकेसाठी गेल्या हंगामात उल्लेखनीय कामगिरी केली होती. मथीशाने 12 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेत सीएसकेला चॅम्पियन करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. तसेच सीएसकेसाठी खेळणारा न्यूझीलंडचा सलामी फलंदाज डेव्हॉन कॉनव्हे याला अंगठ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या टप्प्यात खेळता येणार नाही. डेव्हॉनला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात दुखापत झाली होती.
The answer to "Where's Pathirana"
He is fit and ready to throw Thunder ⚡ balls. Be ready 💣.
Finally a 📸 together with the Legend @matheesha_9 😄 #WhistlePodu #csk #IPL2024 pic.twitter.com/JKsv9gacWm— Amila Kalugalage (@akalugalage) March 22, 2024
आयपीएल 2024 साठी सीएसकेचा संघ :- ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी (विकेटकिपर), मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिशेल सेंटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महेश तीक्षना, रचीन रवींद्र, शार्दूल ठाकुर, डेरिल मिशेल, समीर रिज़वी, मुस्तफिजुर रहमान आणि अवनीश राव अरावली.
महत्त्वाच्या बातम्या-
- IPL सुरू होण्यापूर्वी या दोन टीमने केला मोठा फेरबदल, या 2 खेळाडूंची अखेरच्या क्षणी निवड
- आयपीएलच्या 17 व्या हंगामात सर्वात अनुभवी कर्णधार कोण? वाचा सविस्तर