आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होण्यासाठी आता फक्त काहीच तास शिल्लक आहेत. तर आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 10 पैकी 8 कर्णधार हे भारतीय आहेत, तर फक्त 2 परदेशी कर्णधार आहेत. तसेच काही संघानी तर तडकाफडकी कॅप्टन बदलण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का दिला होता. त्यामुळे आता या 17 व्या हंगामात सर्वच युवा खेळाडू कर्णधार असणार आहेत.
याबरोबरच, आयपीएल 2024मध्ये का सुवर्ण युगाचा अंतही झाला आहे. त्यामुळे एका बाजूला संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंना संधी मिळाल्याने आनंदही व्यक्त केला जात आहे. या निमित्ताने आपण 17 व्या हंगामाआधी कोणत्या संघाने कर्णधार बदलले? तसेच या हंगामात सर्वात अनुभवी कॅप्टन कोण? याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
अशातच आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याच्याकडे असलेलं कर्णधारपद काढून ते हार्दिक पंड्या याला देण्यात आलं आहे. त्यामुळे शुबमन गिल याला गुजरातचा कर्णधार करण्यात आले आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंह धोनी याच्याकडे असलेल्या कॅप्टन्सीची जबाबदारी पुणेकर ऋतुराज गायकवाड याला देण्यात आली. तर सनरायजर्स हैदरबादाने एडन मारक्रमचा पत्ता कट करत ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता पॅट कमिन्सला संघाचा कर्णधार करण्यात आले आहे.
तसेच दुखापतीनंतर श्रेयस अय्यर याची केकआरच्या संघात एन्ट्री झाली आहे. त्यामुळे केकेआरची जबाबदारी ही आयपीएलच्या 17 व्या हंगामात श्रेयस अय्यरकडे आसणार आहे. याशिवाय ऋषभ पंत कार अपघातानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिट्ल्सचे सर्व सूत्र ऋषभ पंत संभाळणार आहे. तसेच लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन केएल राहुल हा देखील दुखापतीनंतर परतला आहे. याशिवाय आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस हाच असणार आहे. तर संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणार आहे. तर शिखर धवन पंजाब किंग्संच कर्णधारपद सांभाळणार आहे.
दरम्यान, श्रेयस अय्यर हा 17 व्या हंगामातील इतर 9 जणांच्या तुलनेत अनुभवी कर्णधार आहे. कारण श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये 55 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच श्रेयस अय्यर याने आयपीएलमध्ये 101 सामने खेळले असून त्याने 101 डावांमध्ये 31.55 च्या सरासरी आणि 125.38 च्या स्ट्राईर रेटने 2 हजार 776 धावा केल्या आहेत. तसेच श्रेयसची 96 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- आयपीएलचा पहिला सामना पाहण्याबाबत रोहितने सांगितला प्लॅन, म्हणाला, “बागेत फिरण्यासाठी…”
- मुंबईच्या कॅम्पमध्ये ‘बूम-बूम’ दाखल! चाहते म्हणाले, “हार्दिकला बाउन्सर मारून…”