क्रिकेटटॉप बातम्या

जो रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम, आता या बाबतीत अव्वल स्थानी

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात यजमान किवी संघाचा दारुण पराभव झाला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहुण्या संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात यजमान संघाचा 8 विकेट्सने पराभव झाला. दरम्यान इंग्लंडच्या जो रुटने दुसऱ्या डावात शानदार खेळी करत कसोटी क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला. त्याने एकाच सामन्यात तीन महान खेळाडूंना मागे टाकले.

जो रूट आता कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध कॅसचर्चमध्ये 15 चेंडूत 23 धावांची तुफानी खेळी खेळली. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ, त्याच्याच संघाचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुक आणि क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. कॅसचर्च कसोटीपूर्वी चौथ्या डावात त्याच्या कसोटी धावांची संख्या 1607 होती. जी या सामन्यानंतर 1630 झाली आहे.

या सामन्यात त्याने पाच धावा करताच ग्रॅम स्मिथ आणि ॲलिस्टर कुकला मागे टाकले. 19 धावा करताच तो कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमधील या कामगिरीची नोंद सचिन तेंडुलकरच्या नावावर होती. चौथ्या डावात त्याने 1625 धावा केल्या होत्या. मात्र कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात जो रूटच्या धावांची संख्या आता 1630 झाली आहे. तर, ग्रॅम स्मिथ आणि कुक यांनी आपापल्या संघांसाठी 1611-1611 धावा केल्या आहेत, तर शिवनारायण चंद्रपॉलने 1580 धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक धावा

1630 धावा – जो रूट
1625 धावा – सचिन तेंडूलकर
1611 धावा – ॲलिस्टर कुक
1611 धावा – ग्रॅम स्मिथ
1580 धावा – शिवनारायण चंद्रपॉल

हेही वाचा-

भारताला क्लीन स्वीप केलेल्या न्यूझीलंडचे दारुण पराभव, इंग्लंडने टी20 शैलीत जिंकला सामना!
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये होणार! टीम इंडियाचे या ठिकाणी होणार सामने
भारताकडून झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया अस्वस्थ, दुसऱ्या कसोटीसाठी नवी योजना आखली

Related Articles