भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर बरीच टीका झाली. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना 295 धावांनी जिंकला होता. भारतीय संघासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. मालिकेतील दुसरा सामना ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात नवीन प्लॅन आखत आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या एका गोलंदाजाने या प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे. ज्यात त्याने पुढच्या सामन्यात संघ नवीन गोलंदाजी योजना घेऊन येणार असल्याचे सांगितले आहे.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड जखमी झाल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे तो दुसरा सामना खेळू शकणार नाही. दरम्यान, जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलंड पुढील सामन्यात प्लेइंग 11 मध्ये सामील होऊ शकतो. पर्थमधील पराभवानंतर ॲडलेड येथे होणाऱ्या डे-नाईट कसोटीसाठी भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांच्याविरुद्ध त्याच्या संघाच्या योजनांमध्ये काही बदल होणार असल्याचे बोलंडने उघड केले.
वेगवान गोलंदाज हेजलवूड स्नायूंचा ताणमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी स्कॉट बोलंड टीम इंडियाला अडचणीत आणण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. बोलंडने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले आणि याआधी त्याने भारताला खूप त्रास दिला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेल्यानंतर बोलंडने माध्यमांशी संवाद साधला आणि तो म्हणाला की, “आम्ही एक संघ म्हणून सर्व भारतीय फलंदाजांसाठी आमच्या योजनांबद्दल चर्चा करत आहोत. मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार नाही. पण आमच्याकडे खूप चांगल्या योजना आहेत. पर्थमध्ये पुन्हा खेळाडूंना पाहिल्यानंतर यामध्ये काही बदल होऊ शकतात.”
बोलंडने आपल्या निवेदनात पुढे म्हटले की, यशस्वी जयस्वालने नक्कीच चांगली फलंदाजी केली. केएल राहुलने दुसऱ्या डावातही चांगली फलंदाजी केली. आम्ही कदाचित पुढील आठवड्यात याबद्दल बोलू काारण आमच्या योजनेत काही बदल होऊ शकतात. पण मला विश्वास आहे की पहिल्या सामन्यात आम्ही जे केले ते चांगलेच होते. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 201 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट कोहलीने कसोटी कारकिर्दीतील 30वे शतक झळकावले. या खेळीमुळेच ऑस्ट्रेलियाचा पहिला कसोटी पराभव झाला.
हेही वाचा-
“विराटसारखे स्वत:वर…” फ्लाॅप ठरलेल्या ऑस्ट्रेलिया फलंदाजांना माजी कर्णधाराने दिला सल्ला
भारतापुढे झुकला पाकिस्तान, चॅम्पियन्स ट्राॅफीच्या हायब्रीड माॅडेलसाठी तयार
IND vs PAK; राजस्थानने खरेदी केलेला 13 वर्षीय खेळाडू पाकिस्तानपुढे ठरला फेल