इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलच्या मेगा लिलावात (IPL Mega Auction) वैभव सूर्यवंशीचे (Vaibhav Suryavanshi) नाव चमकले. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) या 13 वर्षीय युवा खेळाडूवर मोठी बोली लावली, राजस्थानने त्याला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले.
मेगा लिलावानंतर वैभव सूर्यवंशी आज (30 नोव्हेंबर) पहिल्यांदाच पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ॲक्शनमध्ये दिसला. अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. मेगा लिलावानंतर चाहत्यांच्या नजरा वैभववर खिळल्या होत्या. वैभव पाकिस्तानविरूद्ध फलंदाजीत मोठा धमाका करेल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. वैभव पाकिस्तानविरूद्ध पूर्ण फ्लॉप ठरला.
भारतासाठी वैभव सूर्यवंशी सलामीला आला होता. त्याला क्रीझवर आल्याचे पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला पण पाकिस्तानविरूद्धच्या मोठ्या सामन्यात तो दबाव हाताळू शकला नाही. या सामन्यात त्याने केवळ 9 चेंडूंचा सामना केला. 9 चेंडूत त्याने 1 धाव केली. या सामन्यात अली राजाने वैभवला पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
वैभवच्या या खराब कामगिरीनंतर राजस्थान रॉयल्सने (RR) त्याचा समावेश करून काही चूक केली का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वास्तविक, भारताचा पुढचा सुपरस्टार म्हणून वैभवकडे पाहिले जात आहे. राहुल द्रविडही (Rahul Dravid) त्याच्या टॅलेंटवर खूप खूश दिसत होता.
महत्त्वाच्या बातम्या-
WTC Points Table; श्रीलंकेविरूद्धच्या विजयानंतर आफ्रिकेला बंपर फायदा, तर भारताचे वर्चस्व कायम
IND VS AUS; पिंक बॉल कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे 3 भारतीय गोलंदाज
गुलाबी चेंडूच्या कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज