WTC Points Table; श्रीलंकेविरूद्धच्या विजयानंतर आफ्रिकेला बंपर फायदा, तर भारताचे वर्चस्व कायम

दक्षिण आफ्रिका विरूद्ध श्रीलंका (South Africa vs Sri Lanka) कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आफ्रिकन संघाने श्रीलंकेचा 233 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही (WTC Points Table) मोठा फायदा झाला आहे. आफ्रिकन संघाने मोठी झेप घेत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.
श्रीलंकेविरूद्धच्या डर्बन कसोटीतील विजयापूर्वी आफ्रिकन संघ 54.17 टक्के गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता. या विजयासह आफ्रिकन संघाने 59.26 टक्के गुण मिळवले असून ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया आता दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारत अजूनही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बादशाह आहे. भारत 61.11 टक्के गुणांसह शीर्ष स्थानी आहे.
जागतिक कसोटी क्रमवारी गुणतालिका-
भारत- 61.11 टक्के गुण
दक्षिण आफ्रिका- 59.26 टक्के गुण
ऑस्ट्रेलिया- 57.69 टक्के गुण
न्यूझीलंड- 54.55 टक्के गुण
श्रीलंका- 50.00 टक्के गुण
इंग्लंड- 40.79 टक्के गुण
पाकिस्तान– 33.33 टक्के गुण
वेस्ट इंडिज- 26.67 टक्के गुण
बांगलादेश- 25.00 टक्के गुण
महत्त्वाच्या बातम्या-
IND VS AUS; पिंक बॉल कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे 3 भारतीय गोलंदाज
गुलाबी चेंडूच्या कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
IND VS AUS; “परदेशी भूमीवर ही टीम इंडियाची…”, पर्थ विजयाबाबत रिकी पाँटिंगचे मोठे विधान