भारतापुढे झुकला पाकिस्तान, चॅम्पियन्स ट्राॅफीच्या हायब्रीड माॅडेलसाठी तयार

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (ICC Champions Trophy 2025) बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) हायब्रिड मॉडेलसाठी तयार आहे. पण त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर (ICC) 2 अटी ठेवल्या आहेत. मात्र, याबाबत अधिकृत माहिती नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल निर्णय शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी जाहीर करू शकते. परंतु पीसीबीने 2 अटी ठेवून हायब्रीड मॉडेल तयार करण्याचा विचार केला आहे.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. यानंतर बराच वाद झाला होता. पीसीबी आता हायब्रीड मॉडेलकडे वाटचाल करत आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, त्यांनी आयसीसीसमोर 2 अटी ठेवल्या आहेत. पीसीबीचे म्हणणे आहे की, आता 2031 पर्यंत भारतात कोणतीही स्पर्धा आयोजित केली गेली तर त्यासाठीही हायब्रीड मॉडेल लागू केले जावे.
पीसीबीने हायब्रीड मॉडेलसाठी आयसीसीसमोर 2 अटी ठेवल्या आहेत. त्यांची पहिली अट भारताबाबत आहे. रिपोर्टनुसार, पीसीबीचे म्हणणे आहे की, ते 2031 पर्यंत आयसीसी स्पर्धेसाठी भारतात जाणार नाहीत. आयसीसीची कोणतीही स्पर्धा भारतात आयोजित केली जात असेल, तर त्यासाठीही हायब्रीड मॉडेल लागू केले जावे, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs PAK; राजस्थानने खरेदी केलेला 13 वर्षीय खेळाडू पाकिस्तानपुढे ठरला फेल
WTC Points Table; श्रीलंकेविरूद्धच्या विजयानंतर आफ्रिकेला बंपर फायदा, तर भारताचे वर्चस्व कायम
IND VS AUS; पिंक बॉल कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे 3 भारतीय गोलंदाज