भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या मुलाचे नाव काय? या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. त्याच्या जन्मानंतर 15 दिवसांपर्यंत रोहित शर्मा आणि रितिका सजदेहच्या मुलाचे नाव काय आहे हे कोणालाही माहिती नव्हते, परंतु रितिकाने एक खास फोटो शेअर करून आपल्या मुलाचे नाव काय आहे हे सांगितले आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरी द्वारे तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने ख्रिसमसच्या थीमवर तिच्या मुलाचे नाव अहान असल्याचे सांगितले आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 15 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा बाबा झाला होता. त्याची पत्नी रितिका सजदेहने एका मुलाला जन्म दिली होती. स्वतः कर्णधार रोहित शर्माने ही माहिती दिली. ज्यात त्याने एका दिवसानंतर इंस्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिले होते की, आमचे कुटुंब आता चार लोकांचे झाले आहे. आता 1 डिसेंबर 2024 रोजी ही माहिती समोर आली आहे की, रोहित शर्माच्या मुलाचे नाव अहान आहे. रितिकाने स्वतः तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये हे सांगितले आहे.
Rohit 🤝 Ritika 🤝 Sammy 🤝 Ahaan.
– The Christmas celebration 🤍 pic.twitter.com/2WbifiNWFl
— Johns. (@CricCrazyJohns) December 1, 2024
फोटेमध्ये ख्रिसमस थीम असलेली मूर्ती आहे, तिच्या एका बाजूला Rits म्हणजेच रितिका, दुसऱ्या बाजूला Ro म्हणजेच रोहित शर्मा, तिसऱ्या बाजूला Sammy म्हणजेच समायरा आणि चौथ्या लहानाच्या डोक्यावर अहान लिहिले आहे. ज्यावरुन असेसांगितले जाते की रोहित शर्माच्या मुलाचे नाव अहान आहे.
रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलियात आहे आणि तो कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध भारतासाठी सराव सामना खेळत आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जात आहे, कारण टीम इंडियाला ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूने दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. रोहित शर्मा पर्थ कसोटी सामन्यात न खेळल्यामुळे हा सामना खेळत आहे. अशा परिस्थितीत तो सामन्याचा सराव करण्यासाठी मैदानात उतरला असून संध्याकाळी तो फलंदाजी करताना दिसणार आहे.
हेही वाचा-
दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा सलामी करणार नाही! ॲडलेड सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय?
मार्को जॅन्सनने 11 विकेट्स घेत रचला इतिहास, भारतीय गोलंदाजाचा 28 वर्ष जुना विक्रम मोडित!
गुलाबी चेंडूच्या सामन्यात रोहित शर्माची आकडेवारी फारच खराब, दुसऱ्या कसोटीत हिटमॅनची परिक्षा!