आयपीएल 2025चा मेगा लिलाव (IPL Mega Auction) नुकताच पार पडला. दरम्यान सर्व संघांनी त्यांना हवे असतील ते खेळाडू आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. तत्पूर्वी अलीकडे हा प्रश्न आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे की, आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bengaluru) कर्णधार कोण असेल? अलीकडेच, एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक मोठा इशारा दिला होता की विराट पुढील हंगामात आरसीबीचा कर्णधार असेल. पण विराट कोहली किंवा फ्रँचायझीकडून या विषयावर कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
अशा परिस्थितीत विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपद स्वीकारले नाही, तर संघाची कमान सोपवण्यासाठी आरसीबीकडे कोणते पर्याय उपलब्ध असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बातमीद्वारे आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
भुवनेश्वर कुमार- भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हा आरसीबीच्या सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्याला बंगळुरूने मेगा लिलावात 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले. डेथ ओव्हर्समध्ये उत्कृष्ट गोलंदाजी आणि दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्याच्या क्षमतेसाठी तो ओळखला जातो. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर आहे, त्याने आतापर्यंत 181 विकेट्स घेतल्या आहेत. या गोष्टींवरून तो आरसीबीच्या कर्णधारपदासाठी उत्तम पर्याय असल्याचे मानले जात आहे.
कृणाल पंड्या- कृणाल पांड्याने (Krunal Pandya) आयपीएलमध्ये अव्वल स्तरावरील अष्टपैलू खेळाडूचा दर्जा प्राप्त केला आहे. त्याच्याकडे आयपीएलमधील 127 सामन्यांचा अनुभव आहे, ज्यामध्ये त्याने 1,647 धावांसह 76 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2023 मध्ये कृणाल पांड्या लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) 6 सामन्यात कर्णधार असताना त्याने संघाला 3 विजय मिळवून दिले.
यावेळी मेगा लिलावात बंगळुरूने कृणाल पांड्याला 5.75 कोटी रूपयांना विकत घेतले आहे. बंगळुरू संघात लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जोश हेझलवूड आणि टीम डेव्हिड सारखे अव्वल क्रिकेटपटू देखील आहेत.
आयपीएल 2025 साठी आरसीबी संघ- विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल, जोश हेजलवुड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल
महत्त्वाच्या बातम्या-
क्रेग ब्रेथवेटने रचला इतिहास! ‘या’ दिग्गजाला टाकले मागे
VIDEO; शुबमन गिल, अभिषेक नायरने लावली पैज! कोणी मारली बाजी?
इतिहास घडला! भारताच्या या वेगवान गोलंदाजानं एका डावात सर्व 10 विकेट्स घेतल्या!