भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) ॲडेलेड कसोटीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर असलेला गिल आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. ॲडलेड कसोटीपूर्वी, शुबमन गिल आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यात एक पैज लावली गेली होती, ज्यामध्ये 50 अमेरिकन डाॅलर होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पंतप्रधान इलेव्हनविरूद्धच्या सामन्यापूर्वी शुबमन गिल (Shubman Gill) सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर (Abhishek Nayar) यांच्यासोबत सराव सत्रादरम्यान मस्ती करताना दिसला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गिल क्षेत्ररक्षणाचा सराव करत असून अभिषेकसोबत मस्ती करताना दिसत आहे. दरम्यान, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी त्याला एक टास्क दिला.
बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये शुबमन गिल, अभिषेक नायरसोबत क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. गिल आणि नायर यांच्यात चुरशीची लढत झाली. दोघांनीही 50 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 4,200 रूपयांची पैज लावली. दोघांनाही चेंडूने एकच स्टंप मारावा असा टास्क होता. स्टंपला मारण्यापूर्वी नायर म्हणाला की, तो पैज लावत होता की गिल चेंडूने स्टंपला मारू शकणार नाही.
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी शुबमन गिल आणि अभिषेक नायर यांना प्रत्येकी 3 संधी दिल्या. नायर आणि गिल प्रत्येकी एकदा स्टंपला मारण्यात यशस्वी ठरले. दुसरीकडे, टी दिलीपने एका फटक्यात स्टंप उडवला.
Fun, banter, and a whole lot of competitiveness.
Watch @ShubmanGill and @abhisheknayar1 up against each other in a fun fielding drill.
Guess who won this, though 😄 #TeamIndia pic.twitter.com/xtWfgYPYJU
— BCCI (@BCCI) November 30, 2024
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील दुसरा कसोटी सामना (6 ते 10 डिसेंबर) दरम्यान ॲडेलेडच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार युवा फलंदाज शुबमन गिल पुनरागमन करताना दिसू शकतो. या बाॅर्डर-गावसकर मालिकेत भारताने पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इतिहास घडला! भारताच्या या वेगवान गोलंदाजानं एका डावात सर्व 10 विकेट्स घेतल्या!
रोहित शर्माच्या मुलाचे नाव समोर, पत्नी रितिका सजदेहने शेअर केला खास फोटो
दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा सलामी करणार नाही! ॲडलेड सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय?