आयपीएलचा 17 वा हंगाम हा आज पासून सुरू होत असून आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होणार आहे. शुक्रवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. याबरोबरच मुंबई इंडियन्स 24 मार्चपासून गुजरात टायटन्ससोबतच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघात सर्वच खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने शुक्रवार बद्दलचा प्लन सांगितला आहे.
याबरोबरच IPL 2024 शुक्रवारपासून म्हणजेच 22 मार्चपासून सुरू होत आहे. आज बऱ्याच दिवसांनी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली मैदानावर खेळताना दिसणार आहेत. तसेच या दिग्गजांना पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. तर रोहित शर्माने आजच्या प्लॅनबाबत एक मजेशीर ट्विट केले आहे. यामध्ये रोहित शर्माने रोहितने ट्विट करून शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजताचा प्लॅन बद्दल सांगताना म्हणाला आहे की, ‘जिओ सिनेमावर आयपीएल पाहण्यासाठी बागेत फिरत नाही. यावर चाहते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
अशातच भारतीय संघाने नुकतीच इंग्लंडसोबत 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. तर या कसोटी मालिकेच्या सामन्यादरम्यान, स्टंप माइकवरून रोहित शर्माची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाली होती. तसेच आयपीएलपूर्वी सर्व संघांचे खेळाडू आपापल्या टीमसोबत सराव करत आहेत. काल रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचे एकत्र सराव करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. याशिवाय काही महिन्यांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करणारा विराट कोहली देखील बंगळुरूत संघाबरोबर सराव करताना दिसला होता.
Friday ka 6 PM plan:
Garden mein ghumne ka ❌#IPLonJioCinema dekhne ka ✅Simple rakho, aur dekho – kyunki sab yahaan, aur kahaan #Collab
— Rohit Sharma (@ImRo45) March 22, 2024
दरम्यान, आज मुंबई इंडियन्सचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील अहमदाबादमध्ये संघासोबत दाखल झाला आहे. तसेच बुमराह नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खेळला होता. मात्र तो मालिकेतील सर्व सामने खेळला नाही. कारण वर्कलोड मॅनेजमेंट म्हणून त्याला चौैथ्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. आज तो अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला असून आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी सज्ज झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- मुंबईच्या कॅम्पमध्ये ‘बूम-बूम’ दाखल! चाहते म्हणाले, “हार्दिकला बाउन्सर मारून…”
- IPL 2024 मधून आतापर्यंत 13 खेळाडू बाहेर, अनेक दिग्गज नावांचाही समावेश, एका क्लिकवर वाचा संपूर्ण लिस्ट