भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना पर्थच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना ॲडेलेडच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.
पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) उपलब्ध नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण भारत-ऑस्ट्रेलिया संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बद्दल जाणून घेऊया.
दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हर्षित राणाचे (Harshit Rana) स्थान जवळपास निश्चित झाले आहे. सराव सामन्यात त्याने धारदार गोलंदाजी केली. त्याने 6 षटकात 44 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही राणाने आपली ताकद दाखवून दिली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्याने 3 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात त्याने 1 विकेट घेतली. त्याच्यासोबत वॉशिंग्टन सुंदरलाही दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरण्याची संधी मिळू शकते.
शुबमन गिल (Shubman Gill) आणि रोहितच्या पुनरागमनामुळे 2 खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडावे लागू शकते. त्यापैकी पहिले नाव देवदत्त पडिक्कलचे आहे. पर्थ कसोटीत तो विशेष काही करू शकला नाही. ध्रुव जुरेललाही दुसऱ्या सामन्यासाठी ब्रेक दिला जाऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन– यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; या 3 संघांकडे आहेत सर्वात खतरनाक अष्टपैलू खेळाडू!
विराटने कर्णधार पदासाठी नकार दिल्यास, कोण असणार RCBचा कर्णधार?
स्टार खेळाडू पीव्ही सिंधू, लक्ष्य सेनने जेतेपद पटाकावून रचला इतिहास…!