IPLक्रिकेटटॉप बातम्या

IPL सुरू होण्यापूर्वी या दोन टीमने केला मोठा फेरबदल, या 2 खेळाडूंची अखेरच्या क्षणी निवड

आयपीएल 2024 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून नवा विजेता दोन महिनानंतर मिळणार आहे. यासाठी दहा संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. असं असताना दिग्गज खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या आणि गुजरात टायटन्सच्या संघाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता राजस्थान आणि गुजरात टायटन्सने संघात एक बदल केला आहे. 

याबरोबरच, मुंबईने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वी विदर्भावर मात करत 42 व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला. मुंबईच्या विजयात ऑलराउंडर तनुष कोटीयन याने मोठी भूमिका पार पाडली होती. तसेच तनुषने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या मोसमात एकूण 502 धावा केल्या होत्या. त्यामुळे मुंबईकर तनुष कोटीयनला ॲडम झंपाच्या जागी राजस्थान रॉयल्सच्या संघात स्थान देण्यात आले आहे. तर गुजरात टायटन्सने रॉबिन मिन्झच्या जागी बीआर शरथचा संघात समावेश केला आहे.

अशातच बी आर शरथ हा विकेटकीपर बॅट्समन असून तो  देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक टीमसाठी खेळत असतो. यामध्ये बी आर शरथने 20 फर्स्ट क्लास आणि 43 लिस्ट ए सामने खेळले आहेत. तसेच 28 टी20 सामने खेळले आहेत. यामुळे बीआर शरथला गुजरात टायटन्सने त्याच्या 20 लाख या बेस प्राईजमध्ये संघात सामील करून घेतले आहे.

दरम्यान, तनुषला राजस्थान रॉयल्सने 20 लाख रुपये मोजून आपल्या टीममध्ये घेतलं आहे. तसेच तनुषने मुंबईचं 23 टी-20, 26 फर्स्ट क्लास आणि 19 लिस्ट ए सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तर तनुषने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 24, 75 आणि 20 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 62, 1152 आणि 90 अशा धावा केल्या आहेत. आता तनुष आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे मुंबईकर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Related Articles