अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या नव्या पर्वाची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीची धडाकेबाज फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल अशी क्रिकेटप्रेमींना आशा आहे. तर दुसरीकडे संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या मोसमातील पहिल्या सामन्यापूर्वी फॉर्ममध्ये परतला आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्जचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत.
आयपीएलच्या १७ व्या हंगामाची सुरवात ही 22 मार्च रोजी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. तसेच हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर त्याआधी शार्दुल ठाकूरचा फॉर्म पाहिल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे चाहते खूप खुश दिसत आहेत. कारण आयपीएल 2024 पूर्वी मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यातील अंतिम सामन्यात मुंबईसाठी शार्दुल ठाकूर ८व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्यानंतर त्याने 69 चेंडूत 75 धावांची खेळी केली आहे. तर या खेळीत त्याच्या बॅट मधून 8 चौकार आणि 3 षटकार निघाले आहेत.
– Hundred in Semifinal.
– Now Fifty in Final in 37 balls.Shardul Thakur has been amazing in this Ranji Trophy Knockouts – The Lord Thakur. 🔥 pic.twitter.com/ipNQrTUCiu
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 10, 2024
याबरोबरच आयपीएल 2024 च्या लिलावात सीएसकेने शार्दुल ठाकूरला 4 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तो 2018 ते 2021 दरम्यान सीएसकेकडून खेळला आहे. 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळल्यानंतर त्याला पुन्हा एकदा 2024 च्या लिलावात यलो आर्मीचा भाग झाला होता. तसेच शार्दुल ठाकूरला आयपीएल 2023 मध्ये बॅट किंवा बॉलिंगमध्ये कोणतीही मोठी कामगिरी करता आली नाही. हे पाहून कोलकाता नाईट रायडर्सने त्याला सोडले होते.
Shardul Thakur beast mode automatically gets activated everytime the team is in danger!💫❤️🔥
This is what I call Clutch🥶💥https://t.co/eHTJbvQl1g
— Hustler (@HustlerCSK) March 10, 2024
दरम्यान, शार्दुल ठाकूरने 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघातून पदार्पण केले होते. तेव्हापासून, तो 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि 2023 मध्ये केकेआरकडून खेळला आहे. तसेच त्याने आतापर्यंत 86 आयपीएल सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 286 धावा केल्या आहेत. तर ठाकूरच्या नावावर आयपीएलमध्येही अर्धशतक आहे. तसेच इतक्याच सामन्यांमध्ये त्याने ८९ विकेट्स भेटल्या आहेत. तर शार्दुल ठाकूरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 28 झेल घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील खराब कामगिरीवर सचिन तेंडुलकरने घेतला मुंबईच्या फलंदाजांचा समाचार, म्हणाला…
- महादेव बेटिंग ॲप प्रकरणात नवा ट्विस्ट! शाकीब अल हसनच्या अडचणींमध्ये वाढ होणार