---Advertisement---

भारतीय खेळाडूंसाठी खुशखबर! BCCI कडून मोठी घोषणा

On: मंगळवार, फेब्रुवारी 18, 2025 7:45 PM
---Advertisement---

गुरुवार (20 फेब्रुवारी) रोजी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेला सुरुवात करणार आहे. गुरुवारी भारत आणि बांग्लादेश समोरासमोर असणार आहेत. भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी बिसीसीआयने असे विधान केले होते की, दौरा करत असताना भारतीय खेळाडू त्यांच्या कुटुंबासोबत राहणार नाहीत. परंतु, यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. मीडियाच्या अहवालानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळाडू फॅमिली सोबत एक सामना पाहू शकणार आहेत.

बिसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळाडूंना कुटुंबासोबत एक सामना पाहण्याची मुभा दिली आहे.परंतु, यासाठी बिसीसीआयची परवानगी घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच खेळाडू कुटुंबासोबत सामना बघू शकतील. दौरा 45 दिवसांपेक्षा अधिक काळ असेल तरच हा नियम लागू होऊ शकतो पण दौरा त्या पेक्षा कमी काळ असेल तर खेळाडू कुटुंबासोबत वेळ घालवू शकत नाहीत.

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. परंतु , भारतीय संघाचे सामने पाकिस्तान मध्ये न होता दुबई मध्ये खेळले जाणार आहेत. याशिवाय दुबई मध्ये पहिला सेमीफायनल सामना खेळला जाईल. या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सामना (5 मार्च) रोजी खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास: कशी झाली सुरुवात आणि का खेळतात फक्त आठ संघ?

न्यूझीलंडला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी प्रमुख गोलंदाज बाहेर

“आता पाकिस्तानचे आतिथ्य संपूर्ण विश्व अनुभवेल.” रमिझ राजांचे ठळक वक्तव्य !

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---