नवी दिल्ली। ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षाच्या शेवटी होणाऱ्या टी२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने आतापर्यंत कोणताही निर्णय दिलेला नाही. असे असले तरीही बीसीसीआयने मात्र स्पष्ट केले आहे, की ते आयसीसीच्या निर्णयाची वाट न पाहता आयपीएलच्या तयारीला सुरवात करणार आहेत. त्याचबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता टी२० विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) दरम्यान ऑस्ट्रेलिया सरकारने आपल्या खेळाडूंना आधीच आऊटडोअर प्रशिक्षण घेण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी तयारी करण्याचेही म्हटले आहे.
कोरोना विषाणूमुळे होणार्या लॉजिस्टिक समस्येचं कारण देत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) १८ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्यास अपयशी ठरल्याचे आधीच सांंगितले आहे. हे पाहता आता या कालावधीत बीसीसीआय आयपीएलचे (IPL) आयोजन करू शकते.
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, “टी२० क्रिकेट विश्वचषक या आठवड्यात अधिकृतरीत्या स्थगित होणे निश्चित आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना इंग्लंडविरुद्ध मालिका खेळण्यासाठी तयारी सुरु करण्यास सांगितले आहे.”
या वृत्तामध्ये आयपीएलबद्दलही सांगण्यात आले आहे, की ज्या खेळाडूंना या टी२० स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी दिली जाईल, ज्यांना इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर थेट पश्चिम आशिया किंवा कुठेही याचे आयोजन होईल तिथे रवाना केले जाऊ शकते.
ऑस्ट्रेलिया संघ आता इंग्लंड दौऱ्यावर खेळण्यात येणाऱ्या वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेची तयारी करत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, “सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या सरावातून असे दिसून येते की ऍरॉन फिंचच्या (Aaron Finch) नेतृत्वात संघ जैविकदृष्ट्या सुरक्षित वातावरणात इंग्लंडचा दौरा करेल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-या ५ कारणांमुळे आयपीएल २०२०चे आयोजन होऊ शकते युएईत
-Blog: हॅप्पी बर्थडे धोनी- रांची का छोकरा ते कॅप्टन कूल माही
-धोनीच्या अशा ५ सर्वोत्तम खेळी, ज्यामुळे भारताला मिळाले होते अविस्मरणीय विजय