---Advertisement---

मोहम्मद शमीसाठी आनंदाची बातमी? टीम इंडियात पुनरागमनाचे मोठे संकेत

On: सोमवार, फेब्रुवारी 9, 2026 8:02 PM
---Advertisement---

मोहम्मद शमी (Mohmmed Shami) सध्या भारतीय संघापासून दूर आहे. त्याने भारतासाठी आपला शेवटचा सामना ‘चॅम्पियन्स ट्रॉफी 2025’ मध्ये खेळला होता. जवळपास एक वर्षापासून तो टीम इंडियात खेळत नाही. मात्र, सध्या तो बंगालसाठी देशांतर्गत (Domestic) क्रिकेट खेळत असून तिथे त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. आता समोर आलेल्या एका फोटोमुळे शमीच्या पुनरागमनाचे संकेत मिळत आहेत.

6 फेब्रुवारीपासून आंध्र प्रदेश आणि बंगाल यांच्यात रणजी ट्रॉफीचा क्वार्टर फायनल सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी ‘सेंट्रल झोन’चे निवडकर्ते (Selector) आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग मैदानावर पोहोचले होते. खेळ संपल्यानंतर आर.पी. सिंग आणि मोहम्मद शमी यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. या दोघांच्या भेटीच्या फोटोमुळे शमीचं लवकरच भारतीय संघात पुनरागमन होऊ शकतं, अशी चर्चा रंगली आहे.

मोहम्मद शमीने या सामन्यात केवळ गोलंदाजीच नाही, तर फलंदाजीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने अवघ्या 33 चेंडूंत 53 धावांची झंझावाती खेळी केली ज्यात 7 चौकार आणि 3 षटकार समाविष्ट होते. याआधीच्या सामन्यात त्याने ‘सर््हिसेस’ विरुद्ध 5 विकेट्स घेतल्या होत्या. ‘विजय हजारे ट्रॉफी’मध्येही त्याने बंगालसाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती.

आंध्र प्रदेशने पहिल्या डावात 295 धावा केल्या होत्या, ज्याला प्रत्युत्तर देताना बंगालने 629 धावांचा डोंगर उभा केला. बंगालकडून सुदीप कुमारने 299 धावांची मोठी खेळी खेळली. सध्या आंध्र प्रदेश दुसऱ्या डावात 64 धावांवर 3 बाद अशा स्थितीत असून ते अजूनही 270 धावांनी मागे आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---